मधुमेहाच्या रूग्णांसाठी ‘कोरोना’ अधिक धोकादायक ? जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाईन : केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना विषाणूच्या कचाट्यात वयस्कर लोकांसह, लहान मूल आणि असे लोकही येत आहेत ज्यांना मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब किंवा आधीपासूनच कोणता आजार आहे. अशा लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, म्हणूनच हे लोक सहजपणे कोणत्याही संसर्गाला बळी पडतात. वेळेनुसार, संशोधकांनी कोरोना विषाणूबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती मिळविली आहे. दरम्यान, गंभीर विषाणूने पीडित असलेल्या लोकांना, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना हा विषाणू घातक ठरू शकतो कि नाही? तसेच टाइप -1 आणि टाइप -2 मधुमेह असलेल्या दोघांसाठीही या आजाराचा धोका जास्त आहे का? यासारख्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

मधुमेहाच्या रुग्णांवर कोविड -19 कसा परिणाम करतो?
कोविड – 19 हा एक नवीन आजार आहे, त्याबद्दल बऱ्याच गोष्टी अद्याप माहित नाहीत. आतापर्यंत असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत, ज्यानुसार म्हटले जाऊ शकते की, हा विषाणू मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतो. असे असूनही, मधुमेह हा एक आजार आहे, जो रक्तातील साखरेची पातळी वाढवतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो, यामुळे शरीरात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच, मधुमेहाच्या रुग्णांना कोरोना होण्याचा धोका जास्त आहे, असे म्हणणे चुकीचे नाही, परंतु अद्यापपर्यंत अशा प्रकारची कोणतीही नोंद झाली नाही.

मधुमेहाचे रुग्ण भारतात जास्त आहेत, त्यामुळे आपण अपेक्षा करू शकतो कि, कोरोना विषाणूने संक्रमित लोकांमध्ये असे देखील आहेत ज्यांना मधुमेह आहे. मधुमेहाच्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका इतरांप्रमाणेच असतो, दरम्यान, मधुमेहाच्या रुग्णांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू टाईप -1 किंवा टाइप -2 अशा दोन्ही मधुमेह ग्रस्त रुग्णांसाठी धोकादायक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची वेगळी लक्षणे दिसतात?
कोरोना विषाणूची लक्षणे आणि परिणाम इतरांप्रमाणेच मधुमेहाच्या रूग्णात दिसणाऱ्या लक्षणांसारखेच असतात. मात्र, मधुमेहाच्या पेशंटची कोणत्याही संसर्गाविरूद्ध लढा देण्याची क्षमता क्षीण होते, म्हणून त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. तसेच टाइप -1 आणि टाइप -2 मधुमेहामध्ये लक्षणीय फरक आहे. टाइप – 1 मधुमेहामध्ये इन्सुलिनची अत्यंत कमतरता असते. इन्सुलिनशिवाय रक्तात ग्लूकोजची पातळी लक्षणीय प्रमाणात वाढू शकते, म्हणून अशा लोकांना आयुष्यभर इन्सुलिनचा सहारा घ्यावा लागतो. त्याच वेळी, टाइप -2 मधुमेहात इन्सुलिन तर असते, परंतु ते योग्यरित्या कार्य करत नाही. म्हणूनच, या दोन्ही प्रकारच्या मधुमेहावरील उपचार देखील अगदी भिन्न आहेत. आतापर्यंत असा कोणताही अभ्यास उघडकीस आला नाही, ज्याद्वारे म्हटले जाऊ शकते की, कोरोना विषाणूचा दोन्ही प्रकारच्या मधुमेहांमध्ये भिन्न परिणाम होतो. टाइप- 1 मधुमेहात इन्सुलिनची कमतरता असते, त्यामुळे मूत्रपिंड निकामी होणे आणि डोळ्यांना धोका असू शकतो, तर टाइप -2 मध्ये कॉम्प्लिकेशनची शक्यता कमी असते.