CoronaVirus Reinfection : एकदा ‘कोरोना’ची लागण होऊन गेल्यावर पुन्हा संक्रमण होऊ शकतं का ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोणीच विचार केला नव्हता की, कोरोनाविरुद्धची लढाई एवढे दिवस सुरु राहील. अशातच एकदा कोरोनाची लागण होऊन बरी झालेली व्यक्ती पुन्हा कोरोना संक्रमित होऊन हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा ही बाब खूप चिंताजनक ठरते.

कोरोना विषाणूशी अनेक आठवड्यांच्या संघर्षानंतर देखील या आजाराची लक्षणं पुन्हा दिसून येणं सामान्य गोष्ट आहे. पण पुन्हा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह येणं खूप अवघड आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये लोकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याचा अर्थ ते कोरोनामधून बरे झाले नव्हते.

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होऊ शकते का?

आत्तापर्यंतच्या वैज्ञानिकांच्या निरीक्षणानुसार, एखाद्या व्यक्तीला कोरोनाची दुसऱ्यांदा लागण नाही झाली पाहिजे. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात, ज्या पुन्हा संक्रमण होण्यापासून रोखण्यास मदत करतात. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने सांगितले की, असा कोणताच ठोस पुरावा नाही की त्यातून दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे सिद्ध होऊ शकेल.

कोरोनामुक्त झाल्यावर काय बदल होतो?

आपलं शरीर या विषाणूचा सामना करण्याचा प्रयत्न करतं. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात, ज्या पुन्हा संक्रमण होण्यापासून रोखण्यास मदत करतात. अशा प्रकारे माणूस एकदम बरा होतो.

मग पुन्हा कोरोना संक्रमण कसे होते?

पुन्हा कोरोना संक्रमण झाल्याच्या खूप कमी केसेस समोर आल्या आहेत. वैज्ञानिकांच्या मते दुसऱ्यांदा कोरोना सारखे लक्षण दिसण्याची अनेक कारणं असू शकतात.

याचे कारण असेही असू शकते कि, त्या रुग्णाच्या शरीरातील थोड्याफार प्रमाणात असणारा विषाणू, त्यामुळे त्याला पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसू शकतात. आणि पुन्हा एकदा कोरोनाची लागण होऊ शकते.