बद्धकोष्ठतेसह ‘या’ 7 समस्यांवर रामबाण औषध आहे गुळ आणि गरम पाणी, असा करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – गुळ आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. विशेषता पोटाच्या विकारांसाठी रामबाण उपाय आहे. बुद्धकोष्ठता ही सर्रास होणारी समस्या असून तिची विविध कारणे आहेत. या समस्येवर गुळ सेवन करणे हा चांगला उपाय आहे. डॉक्टर्स सुद्धा बद्धकोष्ठतेने त्रस्त लोकांना गुळ खाण्याचा सल्ला देतात. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी गुळ आणि गरम पाणी सेवन करा. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी गुळाचे सेवन कसे करावे जाणून घेवूयात –

हे आहेत फायदे
1 शरीराचे तापमान संतुलित होते.
2 मेटाबॉलिज्म वाढते.
3 शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
4 पोट साफ होते.
5 पोटाचे सर्व विकार नष्ट होतात.
6 पचनशक्ती मजबूत होते.
7 किडनीच्या आजारात लाभदायक

असे करा सेवन
यासाठी रोज सकाळी एक ग्लास पाणी गरम करा. आता यामध्ये स्वादानुसार गुळ टाकून मिसळून घ्या आणि सेवन करा. यामुळे तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. जर कुणी व्यक्ती पोटाच्या विकारांनी त्रस्त असेल, तर त्यास गुळ आणि गरम पाणी जरूर प्यायला द्या. आयुर्वेदानुसार गुळ आणि गरमपाणी बद्धकोष्ठतेत औषधाप्रमाणे काम करते. हे नैसर्गिक एंजाइमला वाढवते आणि पचनशक्तीला गती देते. सोबत किडनीशी संबंधित कोणत्याही रोगाला दूर करण्यासाठी गुळ मदत करतो.