Kadha In Summer : उष्ण हवामानात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली :  वृत्त संस्था – Kadha In Summer : कोरोना काळ सुरू झाल्यापासून अनेक लोक इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे काढे पित आहेत. काढा आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचे सेवन योग्यवेळी आणि योग्य प्रकारे केले पाहिजे. यामुळे इम्युनिटी वाढते तसेच सर्दी, खोकला, तापात तो उपयोगी ठरतो असे म्हटले जाते. परंतु उष्ण हवामानात काढा पिणे योग्य आहे का, याबाबत जाणून घेवूयात…

3 जून राशीफळ : आज ‘प्रीतयोग’, मिथुन, सिंह आणि तुळसह ‘या’ राशींच्या भाग्यात आनंद, इतरांसाठी असा आहे गुरुवार

 

काय असते काढ्यात
काढ्यात गुळवेल, मुलेठी, लवंग, तुळस, दालचीनी, आले, काळीमिरी, हळद, इत्यादी घटक वापरून बनवतात.

उन्हाळ्यात काढा पिणे सुरक्षित आहे का ?
काढा एक आरोग्यदायी पेय असून याचे सेवन थंड आणि कोरड्या हवामानात करावे. जर उन्हाळा असेल तर जास्त मात्रेत काढा प्यायल्यास यामुळे अ‍ॅसिडिटी, उच्च रक्तदाब, बेचैनी, नाकातून रक्त येणे, छातीत जळजळ आणि मळमळ आदी समस्या होऊ शकतात. थर्मोजेनिक प्रकृतीच्या व्यक्तींना यामुळे समस्या होऊ शकतात. काढा गरम असतो.

सुरक्षित प्रकारे प्या काढा
– सायंकाळी झोप घेऊन उठल्यानंतर एक तासानंतर 4 ते 5 वाजताच्या दरम्यान काढा प्या.
– काढा रिकाम्या पोटी पिऊ नका, कारण यातील तत्व अ‍ॅसिडिटी निर्माण करतात. नाश्त्यानंतर याचे सेवन करू शकता.
– एकावेळी 150 एमएलपेक्षा जास्त काढा पिऊ नका. अन्यथा मळमळ, अ‍ॅसिडिटी होऊ शकते.
– काळिमिरी आणि आले गरम असल्याने प्रमाणात वापरा.
– काढ्यात मध आवश्य मिसळा, यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत वेदना या समस्या होणार नाहीत.
– डायबिटीज असेल तर मध किंवा मुलेठीचा वापर टाळा.

READ ALSO THIS :

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

Pune : देहुरोडमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार