बॉलिवूडमध्ये येण्याआधी घटवलं होतं तब्बल 30 किलो वजन, ‘हे’ आहे सोनाक्षी सिन्हाच्या फिटनेसचं सिक्रेट !

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हानं 2010 साली बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. 33 वर्षीय सोनाक्षी गेल्या 10 वर्षात अनेक मोठ्या बदलांना सामोरी गेली आहे. डेब्यू करण्याआधी सोनाक्षीनं 30 किलो वजन कमी केलं होतं. तरीही वजनामुळं ती अनेकदा ट्रोल झाली आहे. लहानपणी तिच्यासोबत झालेल्या छेडछाडीबद्दलही तिनं अनेकदा भाष्य केलं आहे. शाळेत असताना तिचं वजन 95 किलो होतं. मुलं अनेक नावानं तिला चिडवत असे. खुद्द सोनाक्षीनंच याचा खुलासा केला आहे.

काय आहे सोनाक्षीच्या फिटनेसचं सिक्रेट ?

सोनाक्षी बॉडी पॉझिटीव्हिटीवर विश्वास ठेवते. तिला जिमला जाणं किंवा वजन उचलणं आवडत नाही. इंडस्ट्रीत येण्याआधी तिनं स्वत:मध्ये अनेक बदल केले होते. ती वेळेनुसार आणि आवडीचे वर्कआऊट करते. यापैकी एक आहे पिलाटेस.

असा करते व्यायाम

सोनाक्षी रोज सेलिब्रिटी इंस्ट्रक्टर नम्रता पुरोहितकडून ट्रेनिंग घेते. याशिवाय ती रोज उपाशीपोटी 30-45 मिनिटे कार्डियो करते. यानंतर ती 20 मिनिट वेगानं चालते. फिट राहण्यासाठी प्रत्येक दिवशी तिच्या रूटीनमध्ये एखाद्या प्रकारचं ट्रनिंग किंवा कार्डिओ असतं.

https://www.instagram.com/p/CCRhPOmhtsz/

‘असा’ आहे सोनाक्षीचा डाएट

सोनाक्षीला खायला खूप आवडतं. परंतु ही याची काळजी घेते की, एकाच वेळी कमी खाल्लं जाईल. याशिवाय ती ब्रेड गोड आणि तळलेले पदार्थ अजिबात खात नाही. चीट मीलमध्ये ती फक्त पिज्जा खाते तोही खूप कमी.

https://www.instagram.com/p/CCHKQ4hB-xu/

सोनाक्षीनं हेल्दी लाईफस्टाईल सुरू केली आहे तर स्व:हूनच ती जंक फूडपासून दूर रहात आहे. जर मध्ये मध्ये हलकी भूक लागली तर ती नट्स किंवा स्प्राऊट्स किंवा फळं खाते.

https://www.instagram.com/p/CA_NauPB8Ye/

https://www.instagram.com/p/B_qJKhGhsxP/

https://www.instagram.com/p/B_P4o7iBxFm/

https://www.instagram.com/p/B_FhN59Bhyv/

https://www.instagram.com/p/B_FV-4jB14L/

https://www.instagram.com/p/B-1rbujBicr/