‘तात्काळ’ वजन कमी करायचंय तर मग दररोज प्या ‘हा’ चहा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येक व्यक्तीचा दिवस एका चहाच्या कपासह सुरू होतो. काही लोकांना दुधाचा चहा प्यायला आवडतो, तर काही लोकांना लेमन टी प्यायला आवडतो. काही लोक वाढते वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. मात्र इतर अनेक चहाचे प्रकार आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यातील एक ‘रोज टी’ आहे.

आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, गुलाबाचे फूल परफ्युममध्ये वापरले जाते. तसेच हे प्रेमाचे देखील प्रतीक आहे. यासह गुलाबाच्या पानांचा चहाही पिला जातो. यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जाणून घेऊया ‘रोज टी’चे फायदे…

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
आजकाल प्रत्येक तिसरा माणूस लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. जर तुम्हाला तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल, तर दररोज ‘रोज टी’ प्या. त्याच्या सेवनामुळे फॅट बर्न होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. तज्ञांच्या मते, यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे वजन कमी करण्यास उपयुक्त असतात.

टॉक्सिन बाहेर काढण्यास करते मदत
बऱ्याचदा असे दिसून येते की, लोक जंक फूडवर जास्त अवलंबून आहेत. त्यात जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच त्यात मीठही जास्त असते. या पदार्थांना पचन होण्यास बराच वेळ लागतो. यामुळे शरीरात विषारी पदार्थांची साठवण होऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही टॉक्सिन शरीरातून काढून टाकण्यासाठी ‘रोज टी’चा वापर करू शकता. यातील लॅक्सेटिव्ह आणि ड्युरेटीकचे गुणधर्म मेटाबॉलिज्म नियंत्रित करतात. तसेच टॉक्सिन बाहेर काढते.

त्वचेसाठी लाभदायक
यात अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, जे त्वचेची समस्या कमी करण्यास उपयुक्त असतात. ‘रोज टी’ थंड असतो. म्हणून तो त्वचा आणि पोटासाठी फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने त्वचा अधिक सुधारते. तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा चहा घेऊ शकता.

या सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्या कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार घेऊ नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.