मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभरात कोरोना लसीकरण अभियान मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोना लसीबाबत Corona vaccine लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. सोशल मीडियावर अनेक संभ्रम पसरवले जात आहेत. काही तथ्यांमध्ये दावा केला जात आहे की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाच दिवस अगोदर, मासिक पाळीदरम्यान आणि मासिक पाळी संपल्याच्या 5 दिवसानंतर व्हॅक्सीन Corona vaccine घेऊ नये. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सरकारने नवीन गाईडलाईन जारी केली आहे. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

सरकारने सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेले तथ्य आणि दावे फेटाळले होते, ज्यामध्ये म्हटले होते की, मासिक पाळीच्या दरम्यान लस घेणे सुरक्षित नसते. सरकारने म्हटले होते की, मासिक पाळीचा कोरोना व्हॅक्सीनवर कोणताही प्रभाव पडत नाही.

सरकारने नवीन गाईडलाईन जारी करत इतर तथ्य सुद्धा फेटाळली आहेत, ज्यामध्ये म्हटले होते की, मासिक पाळीदरम्यान आणि मासिक पाळी संपेपर्यंत व्हॅक्सीन घेऊ नये. एक्सपर्टने सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

सोबतच म्हटले आहे की, मासिक पाळीदरम्यान महिला लस घेऊ शकतात. याशिवाय, कोरोना गाईडलाईनचे पालन अवश्य करा. यासाठी घरातून बाहेर पडताना डबल मास्क लावा. सोबतच शारीरीक अंतराचे पालन करा आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय