Coronavirus : लॉकडाऊनमध्ये ‘खरेदी’साठी बाहेर गेल्यास ‘या’ गोष्टींची विशेष ‘काळजी’ घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात 11 लाखांपेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. तर 60 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषत: अमेरिका, इटली, आणि स्पेन या देशात सर्वात जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा कहर वाढत आहे. दरम्यान भारतात 4 हजार पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी ही धोक्याची घंटा आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील जनता आपआपल्या घरात आहे. काही जण घरून काम करत आहे. तर काहीजण लॉकडाऊनमुळे अडकून पडल्याने खाण्या-पिण्याच्या वस्तू बाहेरून आणत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने आपण कोरोनाच्या संसर्गापासून वाचू शकता.

सतत बाहेर जाऊ नका
लॉकडाऊन दरम्यान प्रत्येकाने सतत बाहेर जाणे टाळले पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू एकाचवेळी अधिक प्रमाणा आणाव्यात जेणे करून सतत बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. असे करत असताना एकाच गोष्टी काळजी घ्या ती म्हणजे कोणत्याही वस्तूचा अधिक प्रमाणात साठा करून नका. वर्दळीच्या काळात घराबाहेर पडू नका. बाहेर पडण्यासाठी दुपारची योग्य वेळ आहे. कारण दुपारी दुकानात कमी प्रमाणात गर्दी असते त्यामुळे संक्रमीत होण्याचा धोका कमी असतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या दुकानात खरेदी करण्यासाठी जाता त्यावेळी इतर लोकांपासून 2 मीटर अंतरावर उभे रहा.

घरी आल्यानंतर पहिल्यांदा हात धुवा
आपण ज्यावेळी दुकानात खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळी आवश्यक असणाऱ्या वस्तूंनाच स्पर्श करा. खरेदी केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी दुकानात उपलब्ध असलेली बास्केट स्वच्छ असल्याचे तपासून पहा. यानंतर आपण घरी आल्यानंतर पहिल्यांदा आपले हात स्वच्छ धुवा. बरेच लोक घराबाहेर जाताना हातामध्ये हातमोजे घालतात. असे केल्याने आपल्यासाठी अधिक चांगले होईल. हातमोजे घातल्याने आपल्याला संसर्ग होऊ शकत नाही. हातमोजे घातल्यानंतर आपल्या हातांनी चेहरा, तोंड, डोळे आणि नाकाला स्पर्श करू नका, कारण हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

बंद पॅकेटमधील वस्तूंना सॅनेटाईज करण्याची आवश्यकता नाही.
बंद पॅकेटमधील खाण्या-पिण्याच्या वस्तूपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो. पॅकेटमध्ये खाद्य पदार्थ भरताना दुकानदार स्वच्छतेची काळजी घेतात. यासाठी दुकानदार एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर आपले हात धुतात. सध्यातरी बंद पॅकेटमधील खाण्या-पिण्याच्या पदार्थापासून कोणताही धोका नाही त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही.

आजारी असाल तर स्टोअरमध्ये जाऊ नका
जर आपण आजारी असाल तर स्टोअरमध्ये जाऊ नका असा सल्ला दिला जातोय. कोरोना आणि फ्ल्यूची लक्षणे असल्यास आपण घरीत राहणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की, संक्रमीत व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण दिसत नाहीत मात्र आपण त्याच्या संपर्कात आल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आपण आजारी असाल आणि कोरोनाची लक्षण आढळून आल्यास तुम्ही स्वत:ला क्वारंटाईन करुन घ्या.

जर आपले वय 60 पेक्षा अधिक असेल तर बाहेर जाऊ नका
60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना कोरोना पासून अधिक धोका असतो. अशा परिस्थितीमध्ये होम डिलिव्हरी चा पर्याय योग्य आहे. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांनी आपले हात नियमित धुतले पाहिजेत.