कशा पद्धतीनं घरीच बनवावं ‘अ‍ॅलोवेरा’ ज्यूस आणि काय आहेत त्याचे ‘फायदे’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरफड एक औषधी वनस्पती आहे, ज्याला हिंदीमध्ये घृत कुमारी म्हणतात. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कोरफडच्या रसाचे सेवन केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. हे मधुमेह आणि रक्त शुद्धतेमध्ये देखील फायदेशीर आहे. केसांसाठी आणि चेहऱ्यावरील सौंदर्य फुलवण्यासाठी कोरफड हा एक रामबाण उपाय आहे.

यात अँटीऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे-ए, बी, सी, ई बी2, बी3, बी6, बी12 असतात. यासह कोरफडमध्ये मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, जस्त, क्लोरीन आणि पोटॅशियमचे गुणधर्म देखील असतात. कोरफडच्या ज्यूसचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

तथापि, बाजारात मिळणाऱ्या कोरफडच्या ज्यूसमध्ये रसायने आणि रंग मिसळली असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. शुद्ध कोरफडाचे ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर असते. अशा परिस्थितीत नेहमी ताज्या आणि नैसर्गिक कोरफडच्या ज्यूसचे सेवन केले पाहिजे. आपण ते आपल्या घरी देखील बनवू शकता. जर आपल्याला माहित नसेल तर घरी कोरफडचे ज्यूस कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

कोरफडची पाने कापावी

यासाठी, कोरफडच्या वनस्पती पासून त्याची पाने कापा. आपण ज्यूसच्या मात्रेनुसार पाने घेऊ शकता. जर तुम्हाला फक्त स्वतःसाठी ज्यूस बनवायचे असेल तर एक पान कापून ते चांगले स्वच्छ धुवा. यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करा. कोरफडची पाने कापताना त्यावरील काट्यांपासून काळजी घ्या. कोरफडची हिरवी पाने नेहमी ज्यूससाठी घ्यावीत.

जेल काढा

आता पानांचा बाहेरील भाग वेगळा करा आणि चमच्याच्या सहाय्याने जेल बाहेर काढा. यावेळी जेलमध्ये लेटेक्स मिसळणार नाही याची काळजी घ्या. यासाठी आपण पुन्हा एकदा चेक करून जेलमधून लेटेक्स बाहेर काढावे, कारण ते हानिकारक असते.

ज्यूस कसे बनवावे

यासाठी मिक्सरमध्ये दोन चमचे कोरफड जेल टाका. आता त्यात पाणी घालून मिक्स करावे. यानंतर, कोरफड ज्यूस चवदार करण्यासाठी आपण यामध्ये मध, आले आणि लिंबाचा रस घालू शकता. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण लिंबाचे रसयुक्त कोरफड ज्यूस प्यावे. आपल्याला लवकरच त्याचा परिणाम दिसेल.

(डिस्क्लेमर: लेखातील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. यास एखाद्या डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलचा सल्ला समजून घेऊ नये. आजारपण किंवा संसर्गाच्या लक्षणांच्या स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)