Black Fungus & White Fungus : ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसमधील फरक काय? त्यांची लक्षणे काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस भारतात थैमान घालत आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ‘ब्लॅक फंगस’ या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. याच ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव देशातील विविध राज्यांत झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यानंतर आता बिहारमध्ये व्हाईट फंगसची बाधा झालेले रुग्ण आढळत आहेत.

काय आहे ब्लॅक फंगस ?

ब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते.

ब्लॅक फंगसची कारणे काय ?

जे लोक स्टेरॉइडवर आहेत त्यांनी ब्लड शुगर लेव्हल दररोज तपासणे गरजेचे आहे. ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने इम्युनिटी कमकुवत होते. ब्लॅक फंगस होण्यामागचे हेच मुख्य कारण आहे.

ब्लॅक फंगसची लक्षणे काय ?

डोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. त्यामुळे या लक्षणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

काय आहे व्हाईट फंगस ?

शार्प साईट आय हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. विनीत सहगल यांनी सांगितले की, ब्लॅक फंगससारखेच व्हाईट फंगस आहे. जे कोरोनातून बरे झालेल्या किंवा बरे होत असलेल्या रुग्णांमध्ये विशेष करून दिसतो. तसेच ज्यांची इम्युनिटी कमजोर आहे अशांनाही याची बाधा होते.

व्हाईट फंगसची लक्षणे काय ?

त्वचा, पोट, मेंदू, आतील अवयव आणि फुफ्फुस यासह तोंडालाही प्रभावित करतो. हा आजार कोरोना व्हायरससारखाच घातक असू शकतो.

व्हाईट फंगसची कारणे काय ?

ब्लॅक फंगससारखेच व्हाईट फंगसची कारणे आहेत. त्यामध्ये अनियंत्रित मुधमेह, कमजोर इम्यूनिटी, रुग्णालयातील इन्फेक्शन ही त्यामागची कारणे आहेत.