Body Immunity : तुम्हाला माहित आहे का तुमची इम्यूनिटी ‘स्ट्रॉंग’ आहे की ‘वीक’? ‘या’ 16 लक्षणांवरून सहज ओळखा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीची दुसरी लाट भयंकर होत चालली आहे. कोरोनासारख्या आजाराशी लढण्यासाठी इम्यूनिटी स्ट्राँग ( strong immunity)असणे खुप आवश्यक आहे. सफेद रक्तपेशी, अँटीबॉडीज आणि इतर अनेक तत्वांतून इम्यून सिस्टम तयार होते. काही लोकांची इम्यून सिस्टम कमजोर असल्याने ते वारंवार आजारी पडतात. इम्यून सिस्टम चांगली आहे किंवा कमजोर हे कसे ओळखायचे ते जाणून घेवूयात.

अशी ओळखा कमजोर इम्युनिटी-
1 घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त आजारी पडत असाल
2 सतत सर्दी, ताप, खोकला होत असेल
3 हवामान बदलताच काहीतरी त्रास होतो
4 काहीही खाण्या-पिण्यातून ताबडतोब इन्फेक्शन होत असेल
5 डोळ्यांखाली काळे डाग असणे
6 सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने न वाटणे
7 संपूर्ण दिवस एनर्जी लेव्हल कमी असणे
8 कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे
9 पोटात गडबड होणे
10 चिडचिडेपणा जाणवणे
11 सहज आजारी पडणे
12 लवकर थकवा येणे, सतत थकवा जाणवणे

Advt.

अशी ओळखा स्ट्राँग इम्यून सिस्टम-
13 जर औषधाशिवाय संसर्गातून बरे होत असाल
14 सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होत असेल
15 जखम लवकर भरून येत असेल
16 सर्दी-खोकल्याचा लवकर परिणाम न होणे

इम्यूनिटी वाढवण्यासाठी हे सेवन करा
संत्रे, लिंबू, दही, ब्रोकोली, किवी.