चालण्याचे ‘हे’ आहेत 12 फायदे, निरोगी राहण्यासाठी वयोगटानुसार प्रभावी ’वॉक प्लॅन’ !, जाणून घ्या

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी तुम्ही रोज चालण्याचा व्यायाम करू शकता. किती चालायला किंवा चालण्याची योग्य पद्धत हे सुद्धा महत्वाचे आहे. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा आहे. रोज 30 मिनिटे चालल्यास वेगळा व्यायाम करण्याची गरजही नाही. चालण्याचे फायदे आणि वयोगटानुसार वॉक प्लॅन जाणून घेवूयात…

हे आहेत चालण्याचेफायदे

1 हृद्यासंबंधी आजारांचा धोका टळतो.
2 चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
3 मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
4 मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
5 नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे दूर होऊ शकते.
6 हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
7 मेंदूसाठी फायदेशीर ठरतं.
8 ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो.
9 डिमेंशिया आणि अल्झायमर असे आजार उद्भवत नाहीत.
10 फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं.
11 शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
12 एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

वयानुसार वॉक प्लॅन
* 6 ते 17 वर्ष वयोगटातील लोकांनी 15000 पावलं चालावं. 1200 पावलंही चालू शकता.
* 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांनी 12000 पावलं चालणं उत्तम ठरेल.
* 50 वर्ष वय असलेल्या लोकांनी 10000 पावलं चालावं.
* 60 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्यांनी 8000 पावलं चालावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like