वारंवार चक्कर येणे हे ‘व्हर्टीगो’चे लक्षण, 8 लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   व्हर्टीगो हा एक सामान्य रोग आहे. या आजारात व्यक्तीला चक्कर येते. तसेच, आजूकाजूचे सर्व फिरत असल्याचे जाणवते. अनेकदा काही वक्ती भ्रमितही होतात. स्मरणशक्तीवर परिणाम झाल्यसारखे वाटते. तसेच मळमळ आणि उलटी देखील होते. जर तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर लवकरच डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. या समस्येत वेळेवर उपचार न केल्यास ती धोकादायक ठरू शकते. व्हर्टीगो बद्दल सविस्तर माहिती घेवूयात…

व्हर्टीगोमध्ये चक्कर येणे म्हणजे उंचीची भीती नव्हे. हा एक आजार आहे जो कानांच्या आतील भागात होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हर्टीगो व्हर्टीब्युलर सिस्टममध्ये एक प्रकारची समस्या झाल्याने होतो, जी मेंदू नियंत्रित करते. कधीकधी हा आजार मेंदूतील असंतुलनामुळे देखील होतो.

व्हर्टीगोची लक्षणे

1 योग्यप्रकारे ऐकू येत नाही

2 कानाला धडा बसणे किंवा बंद होणे

3 खाण्यापिण्यास त्रास

4 दूरच्या गोष्टी अस्पष्ट दिसणे

5 चक्कर येणे

6 दिशा भ्रम होणे

7 डोकेदुखी

8 मळमळ

व्हर्टीगोवरील उपचार

या समस्येत, वेस्टिब्युलर सिस्टमची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी, कानाच्या अंतर्गत भागाचे एमआरआय केले जाते. जर व्हर्टीगो प्राथमिक अवस्थेत असेल तर ते औषधांच्या मदतीने बरा होतो. जर शेवटच्या टप्प्यात असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. कानाची नियमित काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो. यासाठी, कानातील मळ पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे. कोणताही कठिण पदार्थ कानात घालू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कानात तेल घालावे.

डिस्क्लेमर : मजकूर, टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्या कोणत्याही डॉक्टरचा किंवा वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्या समजू नये. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.