डिप्रेशनमध्ये ‘या’ 4 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात

पोलीसनामा ऑनलाइन – मानसिक आजारांतून बाहेर पडणे खुप अवघड असते. अशा व्यक्तीला आतून खुप मजबूत व्हावे लागते. परंतु, याचा उपचार शक्य आहे. मात्र, उपचारात बेपर्वाई केली तर, तो धोकादायक ठरू शकतो. या दरम्यान रूग्णाने आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. डॉक्टर्ससुद्धा डिप्रेशनच्या रूग्णांना अनेक वस्तू न खाण्याचा सल्ला देतात. डिप्रेशनमध्ये कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या खावू नयेत, ते जाणून घेवूयात –

या वस्तू नियमित खाव्यात

1 सेलेनियम
अनेक रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, सेलेनियमच्या सेवनाने व्यक्तीच्या मूडवर म्हणजेच मनोदशेवर सकारात्मक परिणाम होतो. यासाठी आहारात ब्राझील नट्स, समुद्रातील मासे आणि मांस यांचे सेवन करू शकता.

2 विटामिन-डी
सूर्यप्रकाश सुद्धा तणावासाठी औषधासमान आहे. सूर्यप्रकाश व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच्याशिवाय आहारात ऑयली फिश, ओकरा आणि डेयरी उत्पादनांचा समावेश करा.

3 ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड
एका शोधात हे सांगितले गेले आहे की, डाएटमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड न घेतल्यास डिप्रेशनचा धोका जास्त असतो. हा धोका टाळण्यासाठी आहारात आळशीच्या बीया, सोयाबीन तेल, नट्स, फॅटी फिश, पालेभाज्यांचा समावेश करा.

4 अँटीऑक्सिडेंट्स आणि गुड कार्ब्स
आहारात अँटीऑक्सिडेंट्स आणि गुड कार्ब्स युक्त पदार्थ सेवन करा. कडधान्य, फळे आणि भाज्या सेवन करा.

या वस्तू करू नका सेवन
डिप्रेशनने पीडित व्यक्तीने आपल्या आहारात फ्राइड फुड, जास्त गोड पदार्थ टाळावेत. सोबतच कॅफीन आणि दारूचे सेवन करू नये.