एक्सपर्टकडून जाणून घ्या, ‘पॅप’ टेस्टशी संबंधीत महत्वाच्या गोष्टी आणि 21 वर्षानंतर महिलांसाठी ही टेस्ट का आहे आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ही गर्भाशयाच्या ग्रीवामध्ये कॅन्सरचा शोध घेण्यासाठी केली जाणारी चाचणी प्रक्रिया आहे. 21 वर्षारील प्रत्येक महिलेस प्रत्येक तीन वर्षात एकदा पॅप टेस्ट (Pap test) करण्याचा सल्ला दिला जातो.

काही महिलांमध्ये संसर्ग किंवा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. जर महिला एचआयव्ही बाधीत असेल, अवयव प्रत्यारोपणाच्या किमोथेरेपीमुळे तिची प्रतिकारशक्ती खुप कमी झाली असेल तर तिला नेहमी पॅप टेस्ट (Pap test) करण्याचा सल्ला दिला जातो.

टेस्टसाठी हे आहे आवश्यक ?
पॅप टेस्ट त्या दिवशी केली जाते जेव्हा मासिक पाळी नसेल. या टेस्टच्या पूर्वी संभोग किंवा गुप्तांगाची स्वच्छता टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे परिणाम प्रभावित होऊ शकतात. पॅप स्मीयर टेस्टच्या दरम्यान शांत राहून आणि मोठा श्वास घेणे खुप आवश्यक आहे.

पॅप टेस्टच्या दरम्यान काय होते ?
ही सामान्यपणे लवकर होणारी टेस्ट आहे. या प्रक्रियेत डॉक्टर स्पेकुलम नावाचा डिव्हाईस तुमच्या वेजाईनामध्ये टाकतात, जो गर्भाशयाच्या ग्रीव्हापर्यंत जातो. गर्भाशय ग्रीवातून काही सेल्स काढल्या जातील. तुम्हाला किंचित टोचल्यासारखे वाटेल. या सेल्स लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठवल्या जातील.

याच्या अहवालाचा अर्थ
अहवाल सामान्य किंवा असामान्य असू शकतो. नॉर्मल टेस्टचा अर्थ आहे की, चचणीत कोणतेही असामान्य सेल्स आढळले नाहीत. नॉर्मल टेस्टला निगेटिव्ह म्हटले जाते. तर दुसरीकडे असामान्य टेस्टचा अर्थ असा होतो की, तुमच्या गर्भाशयाच्या ग्रीवामध्ये काहीतरी गडबड आढळली आहे आणि यापैकी काही कॅन्सरचे पूर्व संकेत असू शकतात. डॉक्टर तुमच्या सर्वायकल टिश्यू जवळून पाहण्यासाठी आणखी काही टेस्ट करू शकतात, पण हे तुमच्या पॅप टेस्टवर अवलंबून आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर