दाढीवाले व्हा सावध ! तुम्हाला ‘कोरोना’च्या संक्रमणाचा असू शकतो जास्तच धोका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड -19 चा कहर टाळण्यासाठी देशासह संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सलून बंद केले गेले आहेत आणि लोकांना इच्छा नसतानाही दाढी वाढविण्याचा शौक बाळगावा लागत आहे. दरम्यान तुमची दाढीही कोरोनाच्या कचाट्यात अडकू शकते. होय, आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, दाढी आणि मिशाच्या वेगवेगळ्या स्टाईल आपल्याला विषाणूची लागण होण्याची शक्यता वाढवतात. सद्य परिस्थितीत मास्क न घेता बाहेर जाणे जोखीमचे आहे. ज्यांच्या तोंडावर दाढी असते अशा लोकांना मास्क घालण्यास बरीच अडचणी येऊ शकते. दाढीवर मास्क लावण्यामुळे मास्क सुटू शकतो आणि व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.

बहुतेकदा, ज्यांना लांब दाढी असते त्यांच्या मनात हा भ्रम असतो की, त्यांच्या चेहऱ्यावर लांब केस असल्यामुळे, फिल्टरिंगद्वारे हवा शरीरात प्रवेश करते. पण हा केवळ लोकांचा भ्रम आहे. चेहऱ्यावरचे केस कधीही मास्क म्हणून कार्य करू शकत नाहीत. दाढी असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर माास्क लावल्यानेे लिकेज होण्याचा धोका 20 पट वाढतो. म्हणूनच सद्यस्थिती लक्षात घेता दाढी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत.

दाढी ठेवल्याने मास्क घालणे कठीण होते आणि त्वचेला पूर्णपणे स्पर्श करू शकत नाही. मास्क पूर्णपणे फिट नसल्याने बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करू शकतात आणि कोरोना विषाणूचा धोका वाढवू शकतात.

आरोग्य तज्ञांच्या मते, जरी हलकी दाढी किंवा क्लीन शेव तुम्हाला सूट करीत नसले तरी ते आपल्याला लांब दाढीपेक्षा अधिक संरक्षण देते. वेगवेगळ्या दाढीचे स्टाईल आपल्या चेहर्‍यावरील मास्क प्रभाव कमी करते. चेहर्‍यावरील केस फिल्टर म्हणून कार्य करतात या भ्रम आपण बाळगू नये. कारण हे केस फार सूक्ष्म जंतूंना रोखू शकत नाहीत. चेहर्‍यावरील केसांमुळे, मास्क गळती होण्याची शक्यता 20 ते 1000 पट वाढते.