नाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण ! अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि डोळ्यांसाठी अतिशय लाभदायक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ’सत्यानाशी’ (डरीूंरपरीहळ) नाव ऐकून कुणीही विचार करू शकत नाही की, ही वनस्पती किती कामाची आहे. सत्यानाशीचे रोप आणि बी यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. ही कुठेही उगवते. आजारातील उपचाराची क्षमता असल्याने तिचा वापर अनेक शतकांपासून केला जात आहे. सत्यानाशीमध्ये अँटीमायक्रोबियल, अ‍ॅटीडायबिटी, एनाल्जेसिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीस्पास्मोडिक, अँटीऑक्सिडेंट गुण भरपूर आहेत. बद्धकोष्ठतेवर याचे बी गुणकारी आहे. सोबतच सत्यानाशी त्वचा, डोळे, खोकला, काविळसारखे आजार दूर करण्यासाठी उपयोगी आहे.

हे आहेत फायदे

1 त्वचा

सत्यानाशी पावडरचा उपयोग करून विविध त्वचारोगांवर उपचार करता येतो.

2 लघवीच्या समस्या

सत्यानाशीच्या रोपाच्या रसात मूत्रवर्धक गुण असतात, ज्यामुळे लघवीचे त्रास दूर होतात. मूत्रमार्गात होणारी जळजळ आणि वेदनांमध्ये दिलासा मिळतो.

3 अस्थमा

सत्यानाशीच्या मुळे श्वासाच्या समस्येवर चांगला उपाय आहेत. याच्यामुळे फुफ्फुसात जमा झालेला कफ दूर होतो. अस्थमा आणि श्वासाच्या समस्येत दिलासा मिळतो.

4 डायबिटीज

सत्यानाशीच्या पानांपासून काढलेला रस रक्तातील साखरेचा स्तर कमी करतो. डायबिटीजशी लढण्याची क्षमता यात आहे. याच्या नियमित सेवनाने शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते.

5 अल्सर

सत्यानाशी पावडर पोटदुखी, अल्सर आणि फायब्रॉएडवर उपचारात मदत करते.

6 पोटात पाणी भरणे

पोटात दूषित पाणी जमा झाल्याने जलोदर होतो. या समस्येत सत्यानाशी उपयोगी आहे. याच्या जडी-बूटीने जास्त लघवी येते आणि पोटात जमा पाणी कमी होऊ लागते.

7 काविळ

काविळीत याच्या रोपाचा वापर केला जातो. सत्यानाशी तेलाचे 8-10 थेंब गुळवेलच्या रसात मिसळा आणि प्या.

8 डोळे

डोळ्यातील कोरडेपणा, ग्लूकोमा ठिक करण्यासाठी हे उपयोगी आहे. गुलाब जल, सत्यानाशीच्या अर्काचा रस बनवून याचे 2 थेंब डोळ्यात टाका. हा उपाय दिवसात दोन वेळा करा. यामुळे डोळे लाल होणे, दृष्टीची समस्येतून दिलासा मिळेल.