Periods Tips : मासिक पाळी दरम्यानच्या त्रासात ‘या’ पध्दतीनं रहा आनंदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मासिक पाळी मुलींच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक गोष्टी अश्या असतात, ज्या आपला मूड स्विंग करतात. अशा परिस्थितीत पोटदुखी, ब्लोटिंग, रात्री झोपताना किंवा दिवसा कपड्यांवर डाग पडण्याची भीती, बऱ्याच गोष्टी अश्या असतात ज्या त्रासदायक असतात. प्रत्येक महिन्याला हा त्रास सहन करावाच लागतो. अशा परिस्थितीत जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्यामुळे आपण पिरियड्स टाइमही एन्जॉय करू शकतो….

– गेल्या महिन्यात आपल्याला पिरियड कधी आले होते हे लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत आपण आधीच त्या गोष्टींसाठी तयार असू.

– पिरियड दरम्यान आपल्या आहाराची काळजी घ्या. आपण कोणत्या गोष्टी खाणे टाळू शकता याचा विचार करा.

– पीरियडमध्ये नैसर्गिक पॅड वापरण्याचा प्रयत्न करा.

– आपल्या बॅगमध्ये नेहमी पॅड ठेवा. जेणेकरून जर आपल्याला चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या ठिकाणी पिरीयड आले तरी कसलीही चिंता राहणार नाही.

– या दिवसात स्वत: ला थोडा आराम द्या आणि शरीरातील अंतर्गत उबदारपणा राखून ठेवा.

– हलकी कसरत करा. यामुळे तुमची सिस्टीम योग्य प्रकारे काम करेल.

– स्वत: ला हायड्रेटेड ठेवा. एका दिवसात जितके शक्य असेल तितके पाणी प्या.

– स्वत: ला आनंदी ठेवा आणि आपला कम्फर्टेबल झोन राखून ठेवा.