मधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतसारखे आहे दूध, ‘या’ वेळी करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन – मधुमेहाच्या रुग्णांसाठी ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. यासाठी लोक त्यांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष देतात आणि नियमित अंतराने ब्लड शुगर तपासतात. तसेच वर्कआऊट देखील करतात. तज्ञांच्या मते मधुमेह कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. याचे दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेहाच्या तुलनेत टाइप २ अधिक धोकादायक आहे.

त्यामुळे रुग्णांनी अजिबात निष्काळजीपणा करू नये. तसेच ब्लड शुगर पातळीची नियमित चाचणी करणे देखील आवश्यक आहे. तुम्ही देखील टाइप २ मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि ब्लड शुगर नियंत्रित करायचे असल्यास दररोज न्याहारीत दूध नक्की प्या. यामुळे मधुमेहामध्ये आराम मिळू शकतो. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, दिवसभर दूध रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास किंवा कमी करण्यास सक्षम आहे. चला जाणून घेऊया…

डेअरी सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, सकाळच्या नाश्त्यात दूध पिल्याने दिवसभर रक्तातील साखर कमी राहते किंवा त्यावर नियंत्रण राहते. संशोधकांनी हेही शोधण्याचा प्रयत्न केला की, सकाळच्या न्याहारीत उच्च प्रथिनेयुक्त दूध पिल्याने आणि न्याहारी केल्याने रक्तातील साखर किती काळ नियंत्रित राहते.

या संशोधनात असे दिसून आले की, दूध पिण्यामुळे पाण्याच्या तुलनेत रक्तातील साखरेची पातळी कमी होते. तर सामान्य डेअरी उत्पादनांपेक्षा जास्त प्रथिनेयुक्त दुधामुळे ब्लड शुगर जास्त नियंत्रित होते. तर न्याहारीत उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ घेतल्यासही रक्तातील साखर कमी होते. या संशोधनात पुष्टी केली गेली आहे की, मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी दुध औषधाप्रमाणे आहे. दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचे पचन कमी करण्यात हे यशस्वी होते. यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी नाश्त्यात दुधाचे सेवन केले पाहिजे.