Coronavirus : देशात दररोज ‘कोरोना’च्या 55 हजार चाचण्या : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून लॉकडाउन कालावधीत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी केंद्र सरकारने मोहिम हाती घेतली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनंदेखील (आयसीएमआर) ही माहिती दिली होती. भारत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. देशात सध्या दररोज 55 हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक चाचण्यात करण्यात येत आहेत. सध्या आपली क्षमता दिवसाला 55 हजार चाचण्या करण्याइतकी झाल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर 3 टक्के आहे. तर कोरोना केस दुप्पट होण्याचा दरही 8.78 टक्क्यांच्या जवळपास असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरूवारी डॉ. हर्षवर्धन यांनी अन्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी 6 क्षेत्रातील 6 देशांनी माहितीचे सादरीकरण केले दक्षिण पूर्व आशियामार्फत डॉ. हर्षवर्धन यांनी माहितीचे सादरीकरण त्यांनी केले.

त्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी भारताची कोरोना चाचणीची क्षमता दररोज 55 हजारांपर्यंत पोहोचली असून जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर 3 टक्के असून केस दुप्पट होण्याचा दरही 8.78 टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगला आम्ही सोशल वॅक्सिन म्हणून वापर करण्यास सांगत असल्याचे ते म्हणाले. तसंच देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढून 21 हजार 700 वर पोहोचली आहे., सध्या भारतातच पीपीई किटचे उत्पादन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.