उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचा आरोग्य मंत्र्यांकडून आढावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाच्या प्रगतीचा आज आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्फत सातत्याने या जिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने आज उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह माजी आमदार ओमराजे निंबाळकर, उस्मानाबाद शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, अतिरिक्त आयुक्त डॉ. सतीश पवार अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी तसेच आंतर रुग्ण व बाह्य रुग्ण विभागाच्या इमारत बांधकामासाठी, अंतर्गत रस्ते, लिफ्ट आदी कामांसाठी सीएसआर मधून निधी उपलब्ध करून देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून देखील निधी उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून त्याचा सामान्य रुग्णांना फायदा व्हावा यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्थापत्य बांधकाम तसेच विद्युतीकरण अशा कामांवर आतापर्यंत 35 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र फर्निचर, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, अग्निसुरक्षा आदी स्थापत्य आणि विद्युत कामांसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांसाठी सीएसआर मधून निधी मिळविण्याबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून निधी देण्याबाबत ही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

रुग्णालयाच्या कामासाठी आगामी डीपीडीसी मध्ये चार कोटी 60 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करावा असे निर्देश पालकमंत्री श्री. खोतकर यांनी या बैठकीतच जिल्हा नियोजन विकास अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे नजीकच्या काळात हा निधी उपलब्ध होणार असल्याने रुग्णालयाच्या कामाला गती मिळेल, असे खोतकर यांनी सांगितले.

तातडीने या रुग्णालयाचे काम पूर्ण करून सामान्य रुग्णांना तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास

 

You might also like