मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर; म्हणाले – ‘काँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच याला अटकाव करण्यासाठी, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी असं एक नमूद केलेलं पत्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिल होत. या पत्रावरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रत्युत्तर दिल आहे. मनमोहन सिंग यांना लसीकरणाचं महत्त्व समजत आहे, मात्र त्यांच्याच पक्षाच्या जबाबदार पदांवर असणाऱ्या आणि काँग्रेसचं सरकार असणाऱ्या राज्यांमधील नेते तुमच्या या मताशी सहमत नाहीत. अशा शब्दात काँग्रेसच्या अन्य नेत्यावर निशाणा साधला आहे.

मनमोहन सिंग यांच्या पत्रावरून डॉ. हर्ष वर्धन म्हणाले कि, मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या लसीवर ते बोलले, ही अत्यंत दुःखद बाब आहे, ही गोष्ट हैराण करणारी आहे, की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शास्त्रज्ञ आणि लसीची निर्मिती करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी एक शब्दही बोलला नाही. भारतात २ लसींची निर्मिती होणं, ही देशासाठी अभिमानाची बाब नाही का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पुढे हर्ष वर्धन म्हणाले, काँग्रेस सदस्य लसीच्या परिणामाबाबत अफवा पसरवत लोकांच्या जीवनासोबत खेळ करत राहिले. काहींनी तर सार्वजनिक ठिकाणी लसीला वाईट म्हटलं मात्र नंतर स्वतःच जाऊन लस घेतली असा टोमणा सुद्धा आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मनमोहन सिंग यांच्या पत्रावर मारला आहे.

पत्रात काय म्हणाले होते मनमोहन सिंग?

लस निर्माता कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला सरकारने येत्या ६ महिन्यांसाठी आणि किती डोसची ऑर्डर दिली आहे हे सरकारने जाहीर करावे. जर आपण या ६ महिन्यांच्या काळात निश्चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील. तर कोरोनाच्या या लसींच्या डोसचे वितरण हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. आपण किती नागरिकांचे लसीकरण केले आहे हे पाहण्याऐवजी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिले पाहिजे. यासोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मदत आणि राज्यांना मदत देण्याबाबतही मनमोहन सिंग यांनी या पत्रात नमूद केलं होत.