…म्हणून तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, राजेश टोपेंनी केले भावनिक ट्विट

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आईच्या निधनानंतर त्यांनी भावनांना ट्विटरद्वारे मोकळी वाट करून दिली आहे. ती अजातशत्रु होतीएका शब्दानेही तिने कुणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, असे भावनिक ट्विट टोपे यांनी केले आहे.

जालन्यातील अंबड तालुक्यात असणार्‍या मूळगावीच आज संध्याकाळी 4 वाजता शारदाताईंवर अंत्यसंस्कार होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अ‍ॅडमीट करण्यात आले होते. काल रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होते. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करत होते. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like