Coronavirus : नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला आरोग्य मंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार युद्ध पातळीवर कोरोना रोखसाठी प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना खासगी रुग्णालयांना देखील सरकारने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती व उपाययोजना संदर्भात कराड येते बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राजेश टोपे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, खासगी रुग्णालय पेशंटना तपासत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. असे करणे चुकीचे असून अशा तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खासगी रुग्णालयांनी Antigen Kit ठेवल्या पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने नव्या 500 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात शनिवारी उच्चांकी 12 हजार 822 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 हजार 081 रुग्ण बरे झाले असून राज्यात 3 लाख 38 हजार 262 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचवेळी शनिवारी दिवसभरात 275 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 367 इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 3.45 टक्के इतका आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like