Coronavirus : देशात आतापर्यंत 724 कोरोना रूग्ण, 2 महिन्याच्या आत 40000 व्हेंटिलेटर खरेदी करणार : गृह मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची संख्या ७२४ झाली असून याने १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांच्यानुसार, देशात मागच्या २४ तासात कोरोना व्हायरस संक्रमितांची ७५ नवीन प्रकरणे समोर आली असून दरम्यान ४ मृत्यू झाले आहेत.

अग्रवाल यांच्यानुसार, कोरोना व्हायरस संक्रमित लोकांच्या उपचारासाठी महत्वाची पावले उचलली जात असून याच क्रमाने पब्लिक सेक्टर युनिटला १० हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे आदेश दिले गेले आहे. यासोबतच भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडला पुढच्या १-२ महिन्यात ३० हजार व्हेंटीलेटर खरेदी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. यात याची संख्या ४०,००० होऊन जाईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने रस्त्यावरून आपल्या घरी जाणाऱ्या लोकांना आणि मजुरांना जेवण, पाणी उपलब्ध करून देण्याचा आग्रह राज्य सरकारला केला.

अग्रवाल यांच्यानुसार, देशाच्या १.४ लाख कंपन्यांनी सरकारच्या अपीलवर कमर्चाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. त्यांनी माहिती दिली कि नेशनल टेलिमेडिसिन गाईडलाइन्स जारी केल्या गेल्या आहेत. यांच्यानुसार, आपल्या घरातील उपस्थित डॉक्टरही रूग्णांना सेवा देऊ शकतात. आम्ही देशातील जनतेला आवाहन करतो कि याचा लाभ जनतेने घ्यावा.