भारतात ‘कोरोना’ उपचारामध्ये ‘या’ गोळीचा वापर थांबणार ?

पोलिसनामा ऑनलाईन – भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा डोस दिला जातो. सौम्य तसेच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर हे कॉम्बिनेशन प्रभावी ठरल्याचे आतापर्यंत दिसले आहे. पण लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो.

कोरोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर एचसीक्यू आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या कॉम्बिनेशनने उपचार करण्यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी केली जाण्याची शक्यता आहे. नव्या उपचार पद्धतीमध्ये एचसीक्यू कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर बंद केला जाऊ शकतो. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (खउचठ) करोना रुग्णांवर उपचारांसाठी ही दोन औषधे सुचवली होती.दिल्लीतील एम्स रुग्णालय कोरोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जातील. करोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरे औषध दिले जाऊ शकते. एचसीक्यूसह अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरामुळे ह्दयावर परिणाम होत असल्याने या गोळीचा वापर थांबवला पाहिजे. त्याच्याजागी डॉक्सीसायक्लीन किंवा अ‍ॅमॉक्सीसायक्लीन ही औषधे दिली पाहिजेत. यामुळे ह्दयावर कुठलाही परिणाम होत नाही असे खउचठ च्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे. भारतात गंभीर करोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता जास्त भासत आहे.