Coronavirus : प्रेमावर COVID-19 चा ‘वॉच’ ! लॉकडाऊनमध्ये पार्टनरला Miss करत असाल तर ‘या’ 5 युक्त्या अंमलात आणा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   बऱ्या काळापासून लॉकडाऊन असल्याने प्रेमी युगलांचे हाल झाले आहेत. ज्यांना एकमेकांपासून 1 दिवस लांब राहावलं जात नव्हतं आता तेच 21 दिवस आपापल्या घरात चार भिंतीत राहत आहेत. तर दुसरीकडे ज्या लोकांचे लग्न झाले आहे, त्यांच्यासाठी हा वेळ अत्यंत उत्तम आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने आता कोणीही आपल्या जवळच्या मित्रांना भेटू शकत नाहीत. तसेच अनेक जण डेट करु शकत नाहीयेत.

लोक शेजारच्यांना, मित्रांंना भेटू शकत नाहीत. लॉकडाऊनमुळे मैत्रीत, प्रेमात दुरावा निर्माण झाला आहे. काही प्रेमी युगल एकमेकांपासून दूर राहतात परंतु वेळोवेळी भेटून प्रेम व्यक्त करतात.

अशा प्रेमींवर आता कोविड – 19 ने बंधन आली आहेत. अशांसाठी वेळ घालवणं फार काही सोपं नाही. हीच वाईट वेळ सोपी करण्यासाठी काही टीप्स आहेत, ज्या टीप्स स्वीकारुन आपले जोडीदार किंवा प्रेमी युगलांमधील अंतर कमी होऊ शकतात.

  जे आपल्या जोडीदाराची काळजी करतात ते वेळोवेळी त्यांना मेसेज करुन त्यांची विचारपूस करु शकतात, तुमचे जोडीदार तुमच्यापासून शारीरीक स्वरुपात लांब असतील परंतु तंत्रज्ञानाचा वापर करुन तुम्ही त्यांच्या संपर्कात राहू शकतात.

  वेळोवेळी एकमेकांची विचारपूस करु शकतात त्यासाठी व्हिडिओ कॉल, व्हाइस टेक्स्ट, व्हाइस कॉल करु शकतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याबाबत अपडेट राहालं. ज्याने तुमचे नाते देखील मजबूत होईल. तुमच्या जोडीदाराला हे ही वाटेल की त्यांची तुम्ही काळजी घेत आहात.

  सध्या प्रत्येकाची मानसिक अवस्था ठीक नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून त्यांच्या आरोग्याची काळजी करुन त्यांचे मन प्रसन्न ठेवा.

  तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या. लॉकडाऊनमुळे ते चितेंत आणि तणावत आहेत. जर तुमच्या जोडीदारांने तुमच्या कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही तर चिंता करु नका काही वेळाने त्यांच्याशी संपर्क साधा.

–  तुम्ही सध्या तुमचीही काळजी घ्या, असे सिनेमे पाहा जे तुम्हाला आवडतात. ही वेळ लवकरच निघून जाईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जवळीक बनवून ठेवा.