गरम पाण्यासोबत ‘हे’ 4 पदार्थ मिसळून घेतल्यास होतील असंख्य फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गरम पाण्याचे सेवन केल्याने शरीराच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. हे प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका दूर होता. गरम पाणी पोटाच्या समस्या दूर करण्यास उपयोगी आहे, तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. परंतु, गरम पाण्यासोबत काही घरगुती पदार्थ सेवन करणे जास्त लाभदायक आणि आरोग्यवर्धक ठरते. गरम पाण्यात कोणते पदार्थ मिसळले लाभदायक आहे ते जाणून घेवूयात…

1 गरम पाण्यासोबत हळद
हळदीत करक्यूमिन तत्व असते, जे शरीराला कॅन्सरपासून वाचवते. तसेच इम्युनिटी वाढते, पचन सुधारते, कफची समस्या दूर होते, आतील जखम बरी करते, रक्त स्वच्छ होते, शरीर निरोगी राहते.

2 गरम पाण्यासोबत लसूण
गरम पाण्यासोबत लसूण सेवन करणे हृदयासाठी लाभदायक आहे. कोलेस्ट्रॉल कमी होतात. बद्धकोष्ठता दूर होते. पचन सुधारते, कॅन्सरपासून बचाव होतो. हृदयरोग दूर राहतात. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी परिणामकारक आहे.

3 गरम पाण्यासोबत लिंबू आणि मध
गरम पाण्यासोबत लिंबू आणि मध घेतल्याने वजन कमी होते. याच्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे संसर्गापासून रक्षण होते, इम्युनिटी मजबूत हाते, पोटाच्या समस्या दूर होतात. रिकाम्यापोटी सेवन करावे.

4 गरम पाण्यासोबत गुळ
गुळात भरपूर पोषकतत्व असतात. रोज गरम पाण्यातून सकाळी गुळ सेवन केल्यास शरीराची पचनशक्ती मजबूत होते. इम्युन वाढते.