Mansoon Diet : पावसाळ्यात करू नका खाण्या-पिण्याशी संबंधित ‘या’ 4 चूका, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – ऋतूमानानुसार संतुलित आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहू शकते. ईकोसिस्टमचा बॅलन्ससुद्धा कायम राहतो. युनायटेड नॅशन्सची फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशन अशाप्रकारच्या योग्य आणि पौष्टिक आहाराच्या पॅटर्नला दिर्घकाळ चालणारा टिकाऊ डाएट मानते. 2011मध्ये एवाययू जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अशाप्रकारच्या डाएटला ऋतुचर्या म्हणजे आहार आणि ऋतूनुसार वागणे असे समजले जाते.

ऋतुचर्येला निरोगी आणि आजारांपासून वाचण्यास सक्षम मानले जाते. तुम्ही ऋतूनुसार पदार्थांचे सेवन केल्यास खासकरून तेव्हा, जेव्हा ऋतूमध्ये बदल होत आहेत. सध्या पाऊस आहे, तर आपण त्याबद्दलच जाणून घेवूयात. पावसाळ्यात सर्व महिन्यांमध्ये खुप प्रकारच्या हंगामी भाज्या आणि फळे खाण्यास मिळतात, खाण्यापिण्याची खुप व्हाराएटी असते. परतु हा हंगाम आपल्या सोबत अनेक समस्या आणि नुकसान सुद्धा घेऊन येतो कारण मान्सूनमध्ये फूड पॉयजनिंग, डायरिया आणि अन्य आजारा होण्याची शक्यता खुप वाढते.

यासंदर्भातील एक्सपर्ट डॉ. आकांक्षा मिश्रा सांगतात की, मान्सूनला इन्फेक्शनचा काळ मानला जातो. सर्दी, ताप, मलेरिया, डेंगू, पोटाशीसंबंधित इन्फेक्शन, टायफॉईड आणि निमोनियासारखे आजार मान्सूनच्या सीझनमध्ये खुप कॉमन समजले जातात. हे सर्व इन्फेक्शन्सचे धोके पाहता, आम्ही लोकांना नेहमी सल्ला देतो की, त्यांनी संतुलित आणि ताजे शिजवलेले जेवण सेवन करावे, ज्यामुळे मान्सुनच्या हंगामात ते पचवण्यास सोपे जाईल.

पावसाळ्यात डाएटशी संबंधी करू नका या चूका
याबाबत विचार करण्यापेक्षा पावसात आपल्या डाएटमधून कोणकोणते पदार्थ बाहेर काढले पाहिजेत, याकडे तुम्हाला लक्ष दिले पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला डाएटशी संबंधीत त्या कॉमन चूका सांगणार आहोत, ज्या लोक मान्सूनच्या सीझनमध्ये नेहमी करतात :

1. तळलेले, भाजलेले पदार्थ खाणे :
थोडा पाऊस पडायची खोटी, की लगेच कांदा भजी खाण्याचा सर्वांचा मूड होतो. क्वचित तळलेले जेवण खाण्यास काही हरकत नाही, परंतु तुम्ही ते किती मात्रेत सेवन करता हे लक्षात घेणे जरूरी आहे. कारण तुम्ही तळलेले, भाजलेले पदार्थ जास्त खाल्ले तर अपचन, डायरिया आणि पोटाशी संबंधीत अनेक दुसर्‍या समस्या होऊ शकतात. याशिवाय ज्या तेलात तुम्ही भजी किंवा इतर पदार्थ तळले आहेत ते पुन्हा वापररू नका. कारण हे तेल विषारी (टॉक्सिक) होते.

2. हिरव्या पालेभाज्या स्वच्छ न धुणे :
याबात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. यापैकीच एका संशोधनात असे आढळले आहे की, हिरव्या पालेभाज्यांमध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगस आपले घर तयार करून राहतात आणि या सर्वांना वाढण्यासाठी मान्सूनचे वातावरण अनुकूल असते. यासाठी जरूरी आहे की पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या चांगल्याप्रकारे स्वच्छ धुणे आणि उच्च तपामानावर शिजवणे आवश्यक आहे.

3. मांस आणि सीफूड खाणे :
पावसाळ्यातच मासे आणि अन्य सीफूडचा प्रजननाचा काळ असतो. यासाठी या गोष्टी या काळात टाळल्या पाहिजेत. मान्सून दरम्यान होणारे आजार आणि फूड पॉयजनिंगचा धोका सुद्धा असल्याने सीफूड खाऊ नये. तसेच मांससुद्धा इन्फेक्शन कॅरियर असू शकते.

4. घराच्या बाहेर खाणे :
पावसाळ्यात तापमान आणि दमटपणा बॅक्टेरियल आणि फंगल ग्रोथसाठी परफेक्ट मानला जातो. यामुळे पाण्यातून होणार्‍या आजारांचा धोका जास्त असतो. यासाठी या काळाज घराच्या बाहेरचे पदार्थ अजिबात खाऊ नका, विशेषता स्ट्रीट फूड.

खाण्या-पिणे असे ठेवा :

1. द्रव पदार्थ :
या ऋतूमध्ये शक्यतो भरपूर पाण्या प्या, पण लक्षात ठेवा पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असावे. याशिवाय गरम काढा प्या, सूप प्या. अशाप्रकारचे पदार्थ इम्यून सिस्टमसाठी चांगले मानले जातात.

2. फळ :
मोसमी फळे जसे की लीची, जांभूळ, चेरी, नासपाती, डाळिंब, चेरी इत्यादी सेवन करा. यातून फायबर, व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.

3. भाज्या :
या ऋतूमध्ये दुधी भोपळा, दोडकी, घोसाळी, कारली, पडवळ इत्यादी भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. या भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करा.

4. मसाले :
हळद आणि आले या सारखे मसाल आपल्या डाएटमध्ये वाढवा. कारण यामध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इम्फ्लेमेटरी आणि इम्यून सिस्टम वाढवणारी तत्व आढळतात. घरी बनवलेले साधे जेवणच या काळात तुमचे टार्गेट असले पाहिजे.