मशरूम खाल्ल्यानं कमी होतो ‘प्रोस्टेट’ कॅन्सरचा धोका : स्टडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एका अभ्यासात हे आढळले आहे की, मशरूम खाल्ल्याने मध्यम वयाच्या आणि वयस्कर वर्गातील लोकांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. या अभ्यासात एकुण 36,499 पुरुष सहभागी झाले होते. त्यांचे वय 40 ते 79 वर्ष होते. त्यांनी 1990 मध्ये मियागी कोहर्ट स्टडी आणि 1994 मध्ये ओहसाकी कोहोर्ट स्टडीमध्ये भाग घेतला होता. नंतर हा अभ्यासात ’इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

अभ्यासात आढळले की, मशरूम न खाणार्‍यांच्या तुलनेत खाणार्‍या पुरूषांमध्ये 8 ते 17 टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी झाला होता.

जापानच्या तोहोकु युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रमुख लेखक शू झांग यांनी म्हटले की, कारण मशरूमच्या प्रजातींची माहिती एकत्र केली नव्हती, यासाठी हे जाणणे अवघउ आहे की, आमच्या निष्कर्षात कोणते विशिष्ट मशरूमचे योगदान होते. याशिवाय, प्रोस्टेट कॅन्सरवर मशरूमच्या लाभदायी प्रभावाचे तंत्र अनिश्चित आहे.

काय आहे प्रोस्टेट कॅन्सर

प्रोस्टेट पुरूषांच्या प्रजनन अंगाचे एक बाहेरील ग्लँड आहे. प्रोस्टेट ग्लँड स्पर्म सुरक्षित ठेवणारे फ्ल्यूइड बनविण्याशिवाय युरीन कंट्रोल करण्याचे काम करते. प्रोस्टेट होण्याचे खरे कारण अद्याप समजलेले नाही, परंतु काही कारणे आहेत जी कॅन्सरच्या अशाप्रकाराला धोकादायक आहेत. जसे की – धूम्रपान, लठ्ठपणा, सेक्सच्या दरम्यान पसरलेला व्हायरस किंवा शारीरीक शिथिलता म्हणजे व्यायाम न करणे, ही प्रोस्टेट कँन्सरची कारणे होऊ शकतात.