Mushrooms Health Benefits : इम्युनिटी वाढवण्यासह मशरूमचे ‘हे’ आहेत 7 फायदे, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भरपूर पोषकतत्व असलेले मशरूम खाण्यासाठी जेवढे स्वादिष्ट आहे, तेवढेच आरोग्यासाठी लाभदायक आहे. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी आढळते. याशिवाय यामध्ये अँटी ऑक्सीडेंट, अँटीकँसर, इम्यूनोमॉड्यूलेटरी, अँटीमायक्रोबियल, हेपेटोप्रोटेक्टिव्ह , अँटीडायबिटिक आणि अँटी वायरल गुण आढळतात. जे तुमचे अनेक आजारांपासून बचाव करतात. इम्युन सिस्टम योग्य ठेवणार्‍या मशरूममध्ये असे गुण आढळतात, जे डायबिटीज, कोलेस्ट्राल, ब्लड प्रेशर सारखे आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मशरूमचे फायदे जाणून घेवूयात.

1 इम्यून सिस्टम

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मशरूम खा. यांच्या अँटीऑक्सीडेंट गुणांमुळे इम्यून सिस्टम मजबूत राहाते.

2 निरोगी हृदय

यामध्ये बीट ग्लुकेन नावाचे तत्व असल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदय निरोगी राहाते.

3 मजबूत हाडे

मशरूममध्ये भरपूर कॅल्शियम, फॉस्फरससह व्हिटॅमिन डीसुद्धा असल्याने हाडे मजबूत होतात.

4 मधुमेह

मशरूममध्ये अँटी डायबिटीक गुण असल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

5 वजन

यामध्ये फायबरशिवाय पॉलीसेकेराइड, टेरपेन, पॉलीफेनोल, फ्लेवोनोईड्ससारखी बायोअ‍ॅक्टिव्ह तत्व असल्याने वजन नियंत्रणात राहाते.

6 स्किन केयर

मशरूमचे सेवन केल्याने वाढत्या वयात त्वचा तरूण ठेवणास मदत होते.

7 काळे केस

यामध्ये कॉपर, सेलेनियम, व्हिटामिन डी, अँटीऑक्सीडेंट आणि आयर्न सारखी तत्व असल्याने सफेद केस काळे होतात. केसगळती आणि डँड्रफ दूर होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like