Coronavirus : लसीकरणानंतरही घ्यावी लागेल आवश्यक खबरदारी; तरच संसर्ग रोखणे शक्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या वर्षी कोरोना संसर्ग आल्यापासून जगभरातील देशांनी लस तयार करण्याची तयारी सुरु केली. त्याद्वारे या विषाणूचा प्रसार रोखला जाऊ शकतो, कारण डॉक्टर आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना रोखण्यासाठी लस हा एकमेव प्रभावी मार्ग आहे. परंतू सध्या अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत की लस घेतल्यानंतरही लोकांना संसर्ग होत आहे. म्हणून या लसीला दोष देणे चुकीचे आहे. त्याऐवजी लोकांनी केलेले दुर्लक्ष हे मुख्य कारण आहे. म्ह्णूनच संसर्ग टाळण्यासाठी, लोकांनी लस घेतल्यानंतरही त्यांनी मास्क घालावे, हात वारंवार धुवावे आणि सामाजिक अंतर पाळावे.

लसीकरणानंतर संसर्ग होण्याचे प्रमाण कमी

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, टेक्सास साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटर येथे ८१२१ कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ लस घेतली होती. यामधील केवळ ४ जणांना संसर्ग झाला. त्याच वेळी, १४,९९० कर्मचाऱ्यांना यूसी सैन डिएगो हेल्थ ऍण्ड डेविड जेफेन स्कुल ऑफ मेडिसिनमध्ये लस घेतली, दुसरा डोस घेतल्यानंतर काही आठवड्यांत संसर्ग झाल्याची ७ प्रकरणे समोर आली.

लस यासाठी आहे आवश्यक

जर तुम्हाला वाटत असेल की लस घेतल्यानंतर संसर्गाचा धोका पूर्णपणे संपतो तर हे चुकीचे आहे. उपलब्ध असलेली कोणतीही लस १००% सुरक्षेची गॅरंटी देत नाही.

लसीकरणानंतर तुमचे शरीर व्हायरसच्या प्राणघातक परिणामांपासून वाचवण्याचे काम करते. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करा. थोडासा बेजबाबदारपणा तुम्हाला संक्रमित करू शकतो तसेच इतरांनाही.

वॅक्सीन कोविड-१९ इन्फेक्शनच्या वाढत्या प्रसाराला कमी करते, म्हणून डोस घेणे आवश्यक आहे.

लस घेतल्यांनंतरही संसर्ग होण्याची शक्यता

– स्वतःला इम्यून समजून सुरक्षित मास्क घालणे, हात धुणे, सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या सुरक्षित उपायांचे पालन करत नाहीत.

– लसीकरणानंतर डॉक्टर द्वारे दिलेल्या आवश्यक खबरदारीचे पालन करत नाहीत.

– रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे

– ८० ते ९०% लोकसंख्येला लसीकरण होऊपर्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे.