‘या’ 7 गोष्टींचं सेवन केल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, होऊ शकते मोठे नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पाण्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. अनेक आजार दूर ठेवण्यासाठी पाणी पिणे खुप आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज 6 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. परंतु हे आवश्यक नाही की, सर्व लोकांच्या शरीराला समान मात्रेत पाण्याची आवश्यकता भासली पाहिजे, कारण हे तुमच्या डाएटवर सुद्धा अवलंबून आहे. परंतु काही वस्तू अशा असतात ज्या खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे रिअ‍ॅक्शन किंवा आजारी पडू शकता.

1 खरबूज किंवा कलिंगड खाल्ल्यानंतर
खरबूज आणि कलिंगड खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. यामुळे पोटात गडबड होऊ शकते. सोबतच अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.

2 काकडी खाल्ल्यानंतर
काकडी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास जीआय हालचाल वाढेल. यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होईल. ज्यामुळे डायरिया, अतिसारची समस्या होऊ शकतो.

3 भाजलेले चने खाल्ल्यानंतर
भाजलेले चने खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. कारण चने पचवण्यासाठी आपल्या शरीराला तीक्ष्ण पाचकाग्नी किंवा जठराग्नीची आवश्यकता असते. पण पाणी प्यायल्याने हा आग्नी शांत होतो. यामुळे चने पचन होत नाहीत. पचन डिस्टर्ब होते आणि पोटात दुखते.

4 शेंगदाणे खाल्ल्यानंतर
शंगदाण्याचा प्रभाव गरम आहे. तसेच याचा गुण कोरडा असतो. ज्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची इच्छा जास्त होते. असे केल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते. काही वेळानंतर पाणी प्या.

5 गरम दूध किंवा चहानंतर
गरम पेय पदार्थ जसे की गरम दूध किंवा चहानंतर पाणी पिऊ नये. यामुळे नाकातून रक्त येण्याची समस्या सुद्धा होऊ शकते.

6 गरम जेवणानंतर
गरम जेवणानंतर किंवा खुपच गरम जेवण असेल तर अजिबात पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडते. जेवणातील पोषकतत्व शोषण करण्यासाठी शरीराला वेळ दिला पाहिजे. 30 मिनिटानंतर पाणी प्या.

7 आयस्क्रीम खाल्ल्यानंतर
आयस्क्रीम खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. यामुळे घसा खराब होऊ शकतो. 10 मिनिटानंतर पाणी प्या.