शहरातून गावांमध्ये वेगानं फोफावणार्‍या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी नवीन गाइडलाईन्स जाहीर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. शहरातून गावात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामध्ये संसर्गही वाढत आहे. आता हाच वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

मॉनिटरिंग आणि ट्रिटमेंट

–  प्रत्येक गावात थंडी-तापाच्या प्रकरणांवर निरीक्षणे नोंदवण्यासाठी आशा वर्कर्सची मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्यासाथीने हेल्थ सॅनिटायझेशन आणि न्यूट्रिशन समिती असेल.

–  ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळतील त्यांच्या ग्रामीण स्तरावर कम्युनिटी हेल्थ अधिकारी फोनकरून विचारपूस करतील.

–  रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी खालावत असेल तर संबंधितांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाईल

–  थंडी-तापासह श्वसनासंबंधी इन्फेक्शनसाठी प्रत्येक सेंटरवर ओपीडी सुरु केली जाईल

–  संशयित रुग्णाची ओळख पटल्यानंतर हेल्थ सेंटर्सवर रॅपिड अँटिजेन टेस्टिंग केले जाणार आहे.

–  ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत पण ते कोणत्याही संक्रमित रुग्णाजवळ गेले आहेत. त्यांना क्वारंटाईन केले जावे.

होम अँड कम्युनिटी आयसोलेशन

–  80-85 टक्के लोक लक्षणांविना किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असणारे आहेत. अशा रुग्णांना घरात किंवा कोविड केअर फॅसिलिटीमध्ये आयसोलेट करावे.

–  रुग्णांनी कोरोनासंबंधी सर्व नियमावलींचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार क्वारंटाईन व्हावे

होम आयसोलेशनमध्ये मॉनिटरिंग

–   ऑक्सिजन पातळी तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर जास्त प्रमाणात असावेत.

–   प्रत्येकवेळी वापरलेला थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर सॅनिटाईज करावा

–   जर तुमची ऑक्सिजन पातळी 94 च्या खाली जात असेल तर तुम्ही तातडीने ऑक्सिजन बेड असणाऱ्या आरोग्य केंद्रात जाणे गरजेचे आहे.