Coronavirus : नवीन अहवाल ! फक्त श्वास घेतल्यानं देखील पसरू शकतो ‘कोरोना’ व्हायरस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन कोरोना विषाणू श्वास घेताना आणि बोलताना हवेत पसरु शकतो. नुकतीच ही माहिती देताना अमेरिकेच्या सर्वोच्च वैज्ञानिकांनी सर्व लोकांना मास्क घालायचा सल्ला दिला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मधील संसर्गजन्य आजारांचे प्रमुख अ‍ॅन्थोनी फोकी यांनी सांगितले की, मास्क घालण्याचे नियम बदलले पाहिजेत, कारण अलीकडेच अभ्यासात असे दिसून आले आहे की, विषाणू फक्त खोकला आणि शिंकण्यामुळे पसरत नाही तर जेव्हा लोक बोलतात तेव्हासुद्धा विषाणू पसरतात.

आत्तापर्यंत अधिकृतपणे असा सल्ला देण्यात आला होता की, फक्त मास्क घालण्याची किंवा तोंड झाकण्याची आवश्यकता रूग्ण आणि रुग्णांची काळजी घेतात त्यांनाच नाही. सर्व लोकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. फौकीची टिप्पणी त्यावेळी आली जेव्हा नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने (एनएएस) व्हाईट हाऊसला 1 एप्रिल रोजी पत्र पाठविले ज्यामध्ये या विषयावर नुकत्याच झालेल्या संशोधनाचा सारांश पाठविला होता.

आतापर्यंत अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या थेंबामार्फत दूसऱ्या व्यक्तीच्या श्वासामध्ये जातो. याचा अर्थ असा आहे की, जर एखादी व्यक्ती एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या जवळ उभी असेल तर त्या व्यक्तीला देखील कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. तथापि, जर हा विषाणू हवेमार्फत पसरायला लागला तर त्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण जाईल. म्हणून प्रत्येकास मास्क घालण्याचा सल्ला दिला पाहिजे.