नारळ पाणी करते शरीराला रिचार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सकाळी व्यायाम झाल्यानंतर नारळ पाणी पिणं लाभदायक असते. यातील पौष्टिक तत्त्वं शरीराला रिचार्ज करतात आणि हे पाणी पिण्यानं भूक कमी होते. हे पाणी वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. सुंदर त्वचा आणि चमकदार केस नारळ पाणी पिण्यानं चेह‍ऱ्यावरील पिंपल्स, पुरळ आणि डाग दूर होतात. याचं सेवन केल्यानं त्वचा नितळ बनते.

याव्यतिरिक्त केसांसाठी हे उत्तम कंडिशनरचं काम करतं. यामुळे केस लांब, मुलायम आणि चमकदार होतात. नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमसारखी पोषक तत्त्वं असून हे ॲण्टिऑक्सिडेंट आहे. पोटासंबंधी रोग असो अथवा बद्धकोष्ठता, नारळ पाणी पिण्यानं या समस्या दूर होतील. यामुळे पचनशक्तीही वाढते. उच्च रक्तदाब : वेस्ट इंडियन मेडिकल जर्नलप्रमाणे उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नारळ पाणी उपयुक्त आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रोज एक ग्लास नारळ पाणी प्यायला हवं.

You might also like