आरोग्यासाठी नियमित पथ्य आवश्यक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सुदृढ आरोग्याची अपेक्षा सर्वांनाच असते. मात्र त्यासाठी आहारात नैसर्गिकपणा असणं गरजेचं असतं. खाण्याच्या सवयी व अन्न बनवण्याच्या पद्धतीत हा नैसर्गिकपणा आवश्यक असतो. अन्नाबाबतची स्वच्छता व ठरावीक काळानं डायटिंग करणंही गरजेचं असतं. रोजच्या जीवनात काही पथ्यं नियमित पाळल्यास ती व्यक्ती कायम फिट राहू शकते.

अन्न सावकाश व पूर्ण चावून खा. यामुळे अन्नातील पाचकरसांचं प्रमाण वाढतं. शांत व मोकळ्या जागेत जेवण करा. टीव्हीसमोर बसून जेवू नका. जेवताना वाचणं किंवा बोलणं यांसारखी कोणतीही कृती करू नका. जेवताना पाणी किंवा इतर कोणतेही पेय पिऊ नका. जेवताना पाणी प्यायल्यास अन्नातील पाचकरसांचा शरीराला फायदा होत नाही. जेवण झाल्यानंतर किमान दोन तास तरी झोपू नका.