घोरण्याचा असू शकतो अल्झायमरशी संबंध

पोलीसनामा ऑनलाईन झोपेत घोरणे आणि स्मृतीसंबंधीचा आजार अल्झायमर यांच्यातील एक संबंध समोर आला आहे. अमेरिकेतील मायो क्लीनिकच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अध्ययनात असे आढळून आले की, जे लोक रात्री झोपताना घोरतात, त्यांच्यात अल्जाइमरच्या बायोमार्करची पातळी वाढलेली असते. झोपेमध्ये व्यक्तीच्या श्वासाला अडथळा झाल्यामुळे तो घोरतो.

अचानक श्वास थांबणे व पुन्हा सुरू होण्याच्या स्थितीला स्लीप एप्निया असे म्हटले जाते. दुसरीकडे अल्झायमरसाठी एक विशेष प्रोटीन टाऊ जबाबदार असतो. हा प्रोटीन मेंदूचा जो भाग विविध गोष्टी आठवणीत ठेवण्यात भूमिका बजावतो, त्यावर जमा होऊ लागतो. या अध्ययनाचे प्रमुख डिएगो झेड कार्वाल्हो यांनी सांगितले की, हल्लीच झालेल्या अध्ययनांतून स्लीप एप्निया आणि डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश यांच्यामध्ये संबंध असल्याचे दिसून आले होते. हे निष्कर्ष लक्षात घेऊनच शास्त्रज्ञांनी स्लीप एप्निया व टाऊ प्रोटीन जमा होणे यांच्यातील संबंध जाणण्यासाठी हे अध्ययन करणयात आले.