नैसर्गिक उपचार पद्धतीचा अभ्यास करा 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – प्रत्येकाने नैसर्गिक जीवनशैली अंगीकारली तर प्रत्येक व्यक्ती शतायुषी होईल. नैसर्गिक उपचार पद्धतीचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन डॉ. स्वागत तोडकर यांनी केले. उचगाव येथील हिंदमाता वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. आ. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तोडकर म्हणाले, मनुष्य पैसे मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करतो; परंतु आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, अशावेळी साधेसोपे उपचार करून औषधमुक्त समाजासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. यावेळी आ. पाटील यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करून, अशा व्याख्यानमालेतून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन असून, तंत्रज्ञानाच्या जमान्यात व्याख्यानमालेचे महत्त्व कमी होता कामा नये, असे सांगितले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. सूर्यकांत मोरे, एस. एस. पोवार, पं. स. सदस्य सुनील पोवार, विष्णू मोरे, अभिजित खाडे, दिनकर पोवार, युवराज संकपाळ, संतोष खाडे, सुभाष सावंत, प्रकाश माळी, कृष्णा माने, सुनील येवलुजे, नितीन संकपाळ, संदीप पोवार, अमोल पोवार, प्रकाश पोवार, पांडुरंग सावंत उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रमोद ढेकळे यांनी केले. आभार मधुकर चौगुले यांनी मानले.

Loading...
You might also like