टोमॅटो खा, यकृताचा कर्करोग दूर ठेवा

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन – यकृताच्या कर्करोगापासून बचाव करायचा असेल तर आजपासून टोमॅटो खाण्यास सुरूवात करा. एका ताज्या अध्ययनात असे आढळून आले की, टोमॅटोचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यामुळे यकृताचा कर्करोग वाढण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.

हा आाजार उच्च चरबीयुक्त आहार घेतल्यामुळे होतो. उंदरांवर करण्यात आलेल्या एका अध्ययनाच्या आधारेहा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर लाइकोपीन असते. तो एक प्रबळ अँटी ऑक्सिडेंट, अँटी इंफ्लेमेटोरी आणि अँटी-कॅन्सर एजेंट असतो. लाइकोपीन चरबीचे यकृत आजार, इंफ्लेमेशन आणि यकृताचा कर्करोग कमी करण्यास मदत करतो.

अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठातील प्राध्यापक शियांग डोंग वांग यांनी सांगितले की, टोमॅटो आणि त्याच्यापासून बनविल्या जाणाऱ्या सॉस, केचअप आणि ज्यूस यांसारखे पदार्थ लाइकोपीनचा चांगला स्रोत असतो. यकृताच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी लाइकोपीन सप्लीमेंटच्या तुलनेत टोमॅटोची पावडर जास्त प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांना या अध्ययनात आढळून आले.