Health News | शरीरात ‘ही’ 5 लक्षणे आढळली तर कोरोनाच झाला असेल असं नाही, जाणून घ्या कोणत्या गैरसमजाला बळी पडला आहात

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Health News |लोकांच्या मनात कोरोनाच्या भीतीने इतके घर केले आहे की शरीराच्या कार्यात थोडी जरी समस्या जाणवली तर मनात तात्काळ कोरोनाचा विचार येतो. येथे आपण काही अशा लक्षणांबाबत जाणून घेणार आहोत जी अनुभवण्याचा अर्थ तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे असा होत नाही.

हलकी डोकेदुखी
कम्प्युटरवर (Computer) जास्त वेळ बसणे, तासनतास मोबाइल (Mobile) वापरणे, खुप कमी झोप घेणे, इत्यादीमुळे हलकी डोकेदुखी जाणवते. याचा अर्थ तुम्हाला कोरोना झाला आहे असा होत नाही.

अ‍ॅसिडिटी (Acidity)
पोटात काही समस्या झाली की लोकांना वाटते कोरोनाचा प्रारंभिक संकेत आहे. मात्र, अ‍ॅसिडिटी इतर कारणामुळे सुद्धा होऊ शकते.

वेदना
वारंवार हलक्या वेदना जाणवणे किंवा मासिक पाळीतील (Menstruation) वेदना असतील तर चिंतेचे कारण नाही. मांसपेशीच्या वेदनांमुळे असे होते याचा कोविडशी संबंध नाही.

श्वास घेण्यास त्रास
श्वास घेण्यास त्रास हे कोरोनाचे लक्षण असले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे केवळ कोरोनाचेच लक्षण नाही. इतरही लक्षणे दिसायला हवीत. खोकला, (Cough) घशात खवखव, तापासोबत श्वास घेण्यास त्रास होत असेल तर गांभिर्याने घेऊ शकता.

ऐकण्यात त्रास
होय, जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोरोना झाला आहे.
हा संकेत कानात मळ झाल्याचा संकेत असू शकतो.
किंवा मोठ्या आवाज संगीत ऐकण्याचा एक साइड-इफेक्ट (Side-effects) सुद्धा असू शकतो.
परंतु निश्चितच व्हायरससोबत (Virus) याचा काहीही संबंधी नाही.

Web Title :  Health News | 5 symptoms don t necessarily tells you having coronavirus

Accident in Toranmal | नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Red Light | ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा’ ! राजेश्वरी खरातचा नवा अंदाज, ‘रेड लाईट’चं पोस्टर रिलीझ (व्हिडीओ)

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान, आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या