वरचे दूध बाळासाठी हानिकारक

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन – बाळाला मातेच्या स्तनपानासोबत वरचे दूध दिल्यास काही नुकसान होत नाही, असा एक समज असतो मात्र तो चुकीचा आाहे. अशा प्रकारच्या मिश्र दुधामुळे बाळाला अपचन होऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. कमीत कमी सहा महिने बाळाला मातेचेच दूध द्यायला हवे.

आईच्या दुधासोबतच बाहेरचे वा पावडरचे दूध दिल्यास बाळाची प्रकृती बिघडू शकते. वरच्या दुधात अँटिबॉडीज नसतात. यामुळे जुलाब वा इतर संसर्ग होऊ शकतो. बाळाला मूत्रपिंडाचा आजारही उद्भवू शकतो. काही अडचणींमुळे आईला दूध कमी असल्यास तर मिल्क बँकेतून बाळासाठी दुधाची व्यवस्था करता येईल. आईच्या दुधात सर्व पौष्टिक जीवनसत्त्वे असतात. बाळाच्या वाढीसाठी ती उपयुक्त ठरतात. यात अँटीऑक्सिडंट, जीवनसत्त्वे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियमचा समावेश असतो.

आईचे दूध बाळासाठी वरदानच असते. काही महिला आईच्या दुधात काही पोषक घटक मिसळून बाळाला पाजतात. असे प्रकार अयोग्य आहेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढून बाळाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. बाळाच्या शरीरातील पचनव्यवस्था बिघडू शकते. तसेच मूत्रपिंडावरही दुष्परिणाम होऊ शकतात, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

जखमेचे घाव भरण्यास मदत करेल नवा बायोप्रिंटर

फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा

टोमॅटो खा, यकृताचा कर्करोग दूर ठेवा