मोड आलेले चणे खा; मानसिक तणाव दूर करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले चणे खाणं खूप फायदेशीर आहे, यामुळे शरीर स्वस्थ राहते आणि रोग जवळपासदेखील येत नाहीत. चण्यामध्ये फायबरची मात्रा जास्त असते.चणे भिजवून खाल्ल्यानं पोट किंवा कफसंबंधी समस्या टाळता येते. मूत्र समस्या असल्यास किंवा पुन: पुन्हा मूत्र येत असेल, तर चणे अत्यंत फायदेशीर आहे.

रिकाम्या पोटी चणे खाण्यानं शरीरात अतिरिक्त प्रमाणात ग्लुकोज बनत नाही. मधुमेहदेखील नियंत्रणात राहतो. मानसिक तणाव असलेल्या लोकांसाठी चणे खूप फायदेशीर आहेत. सकाळी वाटलेल्या चण्यासोबत साखर किंवा पाणी मिसळून प्यायल्यानं मानसिक तणाव दूर होतो. कावीळ असलेल्या रुग्णांनी नियमितपणे चणे खावे. हे बरेच फायदेशीर असतात. मोड आलेले चणे हिरव्या मुगासोबत खाल्ल्यानं प्रोटीनची मात्रा वाढते. नियमित सेवनानं थकवा दूर होण्यास मदत मिळते.

बहुगुणी आहे सुगंधी नीलगिरी तेल