सतत पोटदुखीचा त्रास होतोय ? जाणून घ्या ‘हे’ 6 सोपे घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पोटदुखी हा आजार असा आहे जो कोणत्याही वयात उद्भवतो. लहान मुलांचं, जंत झाल्यानं पोट दुखतं तर अपचन, गॅस किंवा इतर कारणांमुळं मोठ्यांनाही हा त्रास होतो. अनेकदा याची कारणं वेगळी देखील असू शकतात. कारणं काहीही असो आपण यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

पोटदुखीवर काही रामबाण उपाय पुढीलप्रमाणे –

1) 10 ग्रॅम गूळ आणि अर्धा चमचा हिंग एकत्र करून त्याची गोळी करावी. ही तयार गोळी घेतल्यानंतर त्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्यावं. पोटात जंत झाले असतील तर ते मरतील आणि पोदुखी दूर होईल.

2) पोटदुखीसोबत जुलाब होत असतील तर कोऱ्या चहामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकावा. असा चहा पिल्यानंतर जुलाब आणि पोटदुखी थांबते.

3) एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करावा. त्यानंतर हे पाणी प्यावं.

4) सुंठ, जिरं आणि काळी मिरी समप्रमाणात घेऊन त्याची पूड करावी. नंतर ही तयार पूड अर्धा चमचा घेऊन गरम पाण्यासोबत प्यावी.

5) एक ग्लास पाण्यात खायचा सोडा मिक्स करून प्यायल्यास पोटातील गॅसेस दूर होतात.

6) पोट दुखत असताना प्रचंड वेदना होत असतील तर एक चमचा आल्याच्या रसात मध मिक्स करून त्याचं सेवन करावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.