साबुदाण्याचे ‘हे’ 10 जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सफेद मोत्यांसारखे दिसणारे छोट्या आकाराचे साबुदाणे उपवासासाठी प्रामुख्याने खाल्ले जातात. याचा वापर उपवासाचे खाद्य म्हणूनच केला जातो, परंतु याच्यातील गुणधर्म आजही अनेक लोकांना माहिती नाहीत. जर तुम्हालाही माहिती नसतील तर जाणून घ्या साबुदाण्याचे हे 10 जबरदस्त फायदे.

हे आहेत फायदे

1 उष्णतेवर नियंत्रण
एका संशोधनानुसार साबुदाणा तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करतो. याचा तांदळासोबत वापर केल्यास शरीरात वाढणारी उष्णता कमी होते.

2 अतिसार
एखाद्या कारणाने पोट खराब झाल्यास किंवा अतिसाराची समस्या झाल्यास दूध न टाकता बनवलेली साबुदाण्याची खीर खाणे खुपच परिणामकारक ठरते. यामुळे ताबडतोब आराम मिळतो.

3 ब्लड प्रेशर
साबुदाण्यातील पोटॅशियम रक्ताभिसरण वाढविण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहे. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित रहाते. याशिवाय हे मांसेपशीसाठी उपयोगी आहे.

4 पोटाच्या समस्या
पोटात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास साबुदाणे खाणे लाभदायक आहे. यामुळे पाचनक्रिया ठीक होते, गॅस, अपचन इत्यादी समस्या दूर होतात.

5 उर्जा
साबुदाणा कार्बोहायड्रेटचा एक चांगला स्त्रोत आहे. यामुळे शरीराला ताबडतोब उर्जा मिळते.

6 गरोदरपणात
साबुदाण्यातील फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गरोदरपणात सेवन केल्यास पोटातील बाळाच्या विकासासाठी सहायक ठरते

7 मजबूत हाडांसाठी
साबुदाण्यात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

8 वजन
ज्या लोकांना इटींग डिसऑर्डरची समस्या असल्याने वजन वाढू शकत नाही, त्यांनी साबुदाण्याचे सेवन करावे.

9 थकवा
साबुदाणा खाल्याने थकवा कमी होतो. साबुदाणा शरीरातील थकवा कमी करून उर्जा वाढवतो.

10 त्वचा
साबुदाण्याचा फेसमास्क तयार करून चेहर्‍याला लावल्याने चेहरा उजळतो. सुरकुत्या दूर होतात.