Covid 19 Most Risky Places : जीवघेणी आहे कोरोनाची दुसरी लाट, वाचायचे असेल तर ‘या’ 7 ठिकाणांपासून रहा दूर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर जारी आहे. दररोज कोरोना व्हायरसची नवी प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त अलर्ट रहा आणि आपल्या कुटुंबाला शक्य तेवढे सार्वजनिक ठिकाणांपासून दूर ठेवा. कोरोनाची ही दुसरी लाट मुले आणि तरूणांना सुद्धा संक्रमित करत आहे. या दुसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी कोणत्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे ते जाणून घेवूयात…

1.सुपरमार्केट
महिन्याच्या ग्रोसरी शॉपिंगसाठी सुपर मार्केटमध्ये जाणे टाळा, त्याऐवजी ऑनलाइन ग्रोसरी शॉपिंग करा.

2.मार्केट आणि मॉल
सध्या मार्केट आणि मॉलमध्ये जाण्यास प्रतिबंध आहेच. तरीसुद्धा काही ठिकाणी सुरू असल्यास येथे जाणे टाळा. येथे हजारो लोकांशी संपर्क येतो.

3.पर्यटन स्थळ
उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन करतात परंतु सर्व ठिकाणाहून येथे पर्यटक येत असल्याने अशा ठिकाणी जाणे टाळा. घरातच बसा.

4.पार्क किंवा प्ले ग्राऊंड
मागील दिड वर्षापासून घरात बसून मुले कंटाळली आहेत. अशावेळी ते पार्क किंवा ग्राऊंडवर जाण्याचा हट्ट करू शकतात पण अशा ठिकाणी पाठवणे धोकादायक ठरू शकते.

5. फिटनेस सेंटर
जिममध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. म्हणून घरीच व्यायाम करा.

6.पार्टी अटेंड करणे
पार्टी फंक्शन इत्यादी टाळा. घरात सोशल गॅदरिंग वाढवणे धोकादायक आहे.

7. स्वीमिंग पुल
मुलांना स्वीमिंग क्लासला पाठवू नका. प्रौढांनीही येथे जाणे टाळावे.