नपुंसकतेने आहात त्रस्त? ‘हे’ घटक तुमच्या समस्येचे जिम्मेदार, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पार्टनरसोबत शरीरसंबंधादरम्यान पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये उत्तेजना न येणे किंवा उत्तेजना रोखून ठेवता न येणे या समस्येला इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे नपुंसकता म्हटले जाते. अनेक प्रकरणांमध्ये ही समस्या हीन भावना निर्माण करते.

नपुंसकतेचे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये औषधांचे सेवन, दारू पिणे किंवा धुम्रपान, शारीरिक कमजोरी, मधुमेह ही कारण असू शकतात. ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नपुंसकतेच्या मागील कारणे काय आहेत, याची माहिती आज आपण घेणार आहोत…

एंडोक्राईनने संबंधित आजार

शरीरातील इंडोक्राईन सिस्टिम म्हणजे अंतस्त्रावी तंत्र हार्मोनची निर्मिती करते. जे मेटाबॉलिज्म, यौन क्रिया, प्रजनन, मूड आणि अनेक गोष्टी नियंत्रित करतो. मधुमेह हा एक एंडोक्राईन रोग आहे. यामध्ये वापरण्यात येणारी हार्मोन इन्शुलिनच्या कारणाने शरीरात नपुंसकता येऊ शकते.

न्यरोलॉजिकल संबंधी आणि नर्व संबंधी आजार

अनेक न्यूरोलॉजिकल स्थितींमध्ये नपुंसकतेची रिस्कला वाढवते. नर्व सिस्टिम मेंदूचे रिप्रोडक्शन सिस्टिमसह समतोल क्षमतेला प्रभावित करते. त्यामुळे इरेक्शन होताना अडचणी येऊ शकतात.

औषधांमुळे होत परिणाम

काही औषधे घेतल्यानंतर रक्ताभिसरणावर परिणाम जाणवतो. त्यामुळे इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे लिंगामध्ये वाकडेपणा येतो. मात्र, तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे बंद करू नये. जरी तुम्हाला नपुंसकतेचे कारण बनेल.

नपुंसकता निर्माण करणारी औषध कोणती?

– तमसुलोसिन (फ्लोमॅक्स) सह अल्फा-एड्रीनर्जिक ब्लॉकर्स

– बीटा-ब्लॉकर्स, कार्वेडिलोल (कोरग) आणि मेटोपोलोल (लोप्रेसर)

– कॅन्सर कीमोथेरेपी औषधे, सिमेटिडाइन (टॅगामेट)

– सेंट्रल नर्वस सिस्टम (सीएनएस) अवसादचे औषधे, अल्प्राजोलम (ज़ानाक्स), डायजेपाम (वॅलियम) आणि कोडीन

– सीएनएस उत्तेजक, कोकीन आणि एम्फॅटेमिन.

ह्रदयसंबंधी विकार

हार्ट आणि ब्लड पंप करण्याची क्षमता प्रभावित करणारी स्थिती नपुंसकतेचे कारण बनू शकते. जर पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टवर आवश्यक रक्त पोहोचू शकले नाही तर इरेक्शन होऊ शकत नाही.

लाईफस्टाईल फॅक्टर आणि भावनात्मक अडचणी

इरेक्शनसाठी उत्तेजना अत्यंत गरजेची आहे. अनेकदा हे इमोशनलही असू शकते. जर तुम्ही कोणत्याही इमोशनल समस्येतून जात असाल तर तुमची लैंगिक उत्तेजनाही प्रभावित होईल. तसेच तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबाबत भीती निर्माण झाली असेल तर तुमचे इरेक्शन होण्यात अडचण येऊ शकेल.