Coronavirus : कुटुंबातील कुणी सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास अजिबात घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर होईल बचाव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तुमच्या कुटुंबातील कुणीही सदस्य कोरोना संक्रमित असेल तर घाबरू नका. या गोष्टीचा प्रयत्न करा की, संक्रमित रूग्णांची चांगली देखभाल होईल आणि अटेंडंटला स्वत:ला सुद्धा सुरक्षित राहता येईल. तुम्ही घरीच कशाप्रकारे रूग्णाची काळजी घेवू शकता, तेही संक्रमित न होता, याबाबत जाणून घेवूयात…

1. छोटे घर असेल तर अशी घ्या काळजी

घर छोटे असेल तर वेगळ्या प्रकारे काळजी घ्या. रुग्णापासून किमान 6 फुट दूर रहा. सर्व खिडक्या आणि दरवाजे सतत उघडून ठेवा. सतत मास्क घाला, हँड ग्लव्हज घाला. सतत साबण किंवा सॅनिटायजरने हात स्वच्छ करा.

2. बाथरूम एकच असेल तर…

घरात एकच बाथरूम असेल तर रूग्णाच्या अगोदर बाथरूमचा वापर करा. रूग्णाने बाथरूमचा वापर केल्यानंतर आतील प्रत्येक गोष्ट सॅनिटाइज करा. उरलेले पाणी फेकून द्या. बाथरूममध्ये कमीत कमी वस्तू ठेवा. बाथरूमला जाण्यापूर्वी ते सॅनिटाइज करा.

3. भांडी वेगळी ठेवा

घरातील कोरोना संक्रमित रूग्णाची भांडी वेगळी ठेवा आणि वेगळी धुवा. गरम पाण्यात काहीकाळ भांडी ठेवून नंतर साबणाने धुवून काढा.

4. घर वारंवार सॅनिटाइज करा

रूग्ण ज्या खोलीत आहे ती खोली वारंवार सॅनिटाइज करा. घरातील सर्व पृष्ठभाग दिवसात दोन ते तीन वेळा सॅनिटाइज करा. सॅनिटाइज ग्लव्हज घाला आणि स्वच्छतेनंतर हात 30 सेकंदपर्यंत स्वच्छ करा.

5. आहाराकडे लक्ष द्या

रूग्णासह घरातील सर्व सदस्यांनी इम्यूनिटी वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टीम, काढा, हळदीचे दूध आणि आवश्यक औषधे सेवन करत रहा. जेवणात फळे, भाज्या आणि दूधाचा समावेश करा.