नवी दिल्ली : Health News In Marathi | अवळाळी पाऊस (Unseasonal Rainfall) आता अधुनमधून पडत असला तरी उन्हाचा पारा (Heat) वाढलेलाच आहे. उन्हामुळे डिहायड्रेशन (Dehydration) आणि उष्माघाताचा (Heat Stroke) सर्वात जास्त धोका असतो. परंतु उन्हाळ्यात उष्णतेमुळेच तब्येत बिघडते असे नाही. अनेकदा आपण अशा चूका करतो, ज्यामुळे आजारी पडतो.
उन्हातून आल्यानंतर या गोष्टी टाळा
थंड पदार्थांचे ताबडतोब सेवन :
उन्हातून आल्यानंतर थेड पाणी, फ्रिजमधील पदार्थ, अथवा आईस्क्रीम खाणे टाळा. कडक उन्हामुळे शरीराचे तापमान वाढलेले असते, अशावेळी थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान अचानक बदलू लागते, ज्यामुळे तब्येत बिघडते.
ताबडतोब आंघोळ करणे :
उन्हातून आल्यानंतर ताबडतोब थंड पाण्याने आंघोळ करू नका. आंघोळीपूर्वी शरीराला सामान्य तापमानात थंड होऊ द्या.
एसी अथवा कुलरच्या समोर बसणे :
उन्हातून आल्यानंतर एसी अथवा कुलच्या थंड हवेत बसणे टाळा. अचानक तापमानात बदल झाल्याने सर्दी-ताप,
खोकला आणि अॅलर्जीसारखी समस्या होऊ शकते.
जड अन्न टाळा :
उन्हाळ्यात जड आणि तळलेले पदार्थ पचवणे अवघड होते. उन्हातून आल्यानंतर असे पदार्थ टाळा.
हलके आणि पोष्टिक जेवण घ्या. फळे, भाज्या आणि दहीचा जेवणात समावेश करा.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा