चवीसाठीच नव्हे तर ‘या’ दैनंदिन कामातही फायदेशीर ठरतं मीठ ! जाणून घ्या ‘हे’ भन्नाट फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या मीठाचे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होत असतात. जसं की, कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी, झाडाची वाढ, असे मीठाचे अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) कपड्यांवर किंवा रूमालावर एखादा डाग लागला असेल तर तो मीठामुळं काढता येऊ शकतो. यासाठी डाग लागलेले कपडे काही वेळ मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत. नंतर ते धुवून टाकावेत.

2) दात घासण्यासाठी नवीन ब्रश आणला असेल तर तो काही वेळ मीठाच्या पाण्यात ठेवावा. यामुळं तो बराच टिकण्यासाठी खूप मदत होते.

3) झाडांची योग्य वाढ होत नसेल आणि वारंवार किड लागत असेल तर मीठाचं पाणी करून ते झाडांवर शिंपडावं. यामुळं झाडाचं वय वाढण्यासही मदत होते.

4) घरात सतत मुंग्या होत असतील तर अशा ठिकाणी मीठ टाकावं. यामुळं फायदा मिळेल.

5) चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असतील आणि यामुळं त्रस्त असाल तर मीठाचा स्क्रब करून वापरा. आधी चेहरा ओला करा आणि नंतर हलक्या हातानं मीठ चोळून मसाज करा. यामुळं ब्लॅकहेड्स दूर होतील.

6) कपातील चहाचे डाग दूर करण्यासाठीही मीठाचा वापर करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.